Share Market  Sakal
Share Market

Share Market Today: बाजार सुरु झाल्यानंतर कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? काय सांगतात तज्ञ

Share Market Tips: काल सरकारी क्षेत्रातील बँका वगळता जवळपास सर्वच क्षेत्रातील विक्रीमुळे निफ्टी 19,400 च्या खाली घसरला.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: गुरुवारी बेंचमार्क इंडेक्स घसरणीसह बंद झाले. सरकारी क्षेत्रातील बँका वगळता जवळपास सर्वच क्षेत्रातील विक्रीमुळे निफ्टी 19,400 च्या खाली घसरला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 388.40 अंकांनी अर्थात 0.59 टक्क्यांनी घसरून 65151.02 वर आणि निफ्टी 99.70 अंकांनी म्हणजेच 0.51 टक्क्यांनी घसरून 19365.30 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीमध्ये गुरुवारी कमजोरी दिसून आल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. निफ्टी कमजोरीसह उघडला आणि दिवसभर दबावाखाली राहिला. व्यवसायाच्या शेवटी तो सुमारे 100 अंकांनी घसरला.

डेली चार्ट निफ्टी गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांपासून 19250 - 19500 च्या रेंजमध्ये आहे. खाली 19300-19400 निफ्टीला सपोर्टन दिसत आहे. 19450-19500 वर वरच्या बाजूने रझिस्टंस दिसून येत आहे. हा सपोर्ट आणि रेझिस्टन्स यांच्यामध्ये निफ्टी कंसोलिडेट होत आहे.

डेली आणि आवर्ली मोमेंटम इंडिकेटरमध्ये नेगिटिव्ह क्रॉसओव्हर आहे जो विक्रीचा सिग्नल आहे. एकूणच बाजारात ट्रेंड बदलण्याची चिन्हे नाहीत. अशा स्थितीत शॉर्ट टर्ममधअये बाजारातील कमजोरी कायम राहण्याची अपेक्षा आहे. निफ्टी 19100 च्या पातळीवर खाली जाताना आपण पाहू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • आयटीसी (ITC)

  • एल अँड टी माईंडट्री (LTIM)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • एल अँड टी (LT)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • झायडस लाईफ (ZYDUSLIFE)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT