Share Market Tips Sakal
Share Market

Share Market Today: आज 'या' 10 शेअर्समधून करा मोठी कमाई, काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Share Market Tips : गुरुवारी बाजाराने सलग सहाव्या दिवशी तेजीचा विक्रम केला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: गुरुवारी बाजाराने सलग सहाव्या दिवशी वाढीचा विक्रम केला. एफएमसीजी, बँकिंग, ऑईल अँड गॅस, हेल्थकेअर शेअर्समुळे बाजारात जोरदार वाढ दिसून आली.

बाजार बंद होताना सेन्सेक्स 474.46 अंकांनी म्हणजेच 0.71 टक्क्यांनी वाढून 67,571.90 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 146 अंकांनी म्हणजेच 0.74 टक्क्यांनी वाढून 19,979.20 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँक निफ्टीने हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन तयार केल्याचे एलकेपी सिक्युरिटीजच्या कुणाल शाह यांनी म्हटले. इंडेक्ससाठी 45500 वर सपोर्ट सेव्हल आहे.

जोपर्यंत ही पातळी क्लोजिंग बेसिसवर राखली जाईल, तोपर्यंत कल तेजीचा राहील असेही ते म्हणाले. या सपोर्ट लेव्हलच्या खाली ब्रेकआउट आल्यास मोमेंटममध्ये बदल होऊ शकतो.

या वाढीमुळे पुढील रझिस्टंस 46400-46500 च्या झोनमध्ये दिसत असल्याचे कुणाल शहा यांनी सांगितले. जर इंडेक्सने हा रझिस्टंस तोडला तर तो वरच्या दिशेने आणखी वाढू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • आयटीसी (ITC)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • डॉ. रेड्डी (DRREDDY)

  • ग्रासिम (GRASIM)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • झायडस लाईफ सायन्सेस लि. (ZYDUSLIFE)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT