Share Market  Sakal
Share Market

Share Market Today: आज कोणते 10 शेअर्स इंट्राडेमध्ये मिळवून देतील नफा, काय सांगतात तज्ज्ञ?

Share Market Tips: गेल्या काही दिवसात बाजाराने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, गुंतवणूकदार आता सावध होताना दिसत आहेत

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: मंगळवारी बाजार सपाट बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 29.07 अंकांनी अर्थात 0.04 टक्क्यांनी घसरून 66355.71 वर आणि निफ्टी 8.30 अंकांनी अर्थात 0.04 टक्क्यांनी वाढून 19680.60 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

मंगळवारी बाजार खूपच अस्थिर राहिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. गेल्या काही आठवड्यात बाजाराने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, गुंतवणूकदार आता सावध होताना दिसत आहेत आणि प्रॉफीट खिशात घालत आहेत.

युएस एफओएमसी बैठकीचे निकाल आज येणार आहेत. पण, बाजाराला व्याजदराच्या आघाडीवर कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. तरीसुद्धा, सर्वांचे लक्ष फेडच्या बैठकीकडे असेल. कारण यावरून फेडच्या भविष्यातील रणनीतीचा अंदाज लावता येतो.

तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास दोन दिवसांच्या करेक्शननंतर बाजार 10-दिवसांच्या एसएमए अर्थात सिंपल मूव्हिंग एव्हरेजच्या जवळच्या रेंजमध्ये व्यापार करत आहे. निफ्टीने डेली चार्टवर एक छोटी बियरीश कँडल तयार केली आहे.

इंट्राडे चार्टवर वरच्या स्तरावरून विक्रीचा दबाव दिसून येत आहे. आता इंट्राडे ट्रेडर्सना 19620 वर सपोर्ट दिसत आहे. याच्या वर इंडेक्स टिकून राहिल्यास 19720-19750 च्या पातळीवर पुलबॅक रॅलीची आशा आहे.

दुसरीकडे, निफ्टी 19620 च्या खाली घसरल्यास विक्रीचा दबाव वाढू शकतो. त्यानंतर निफ्टी 19570-19550 पर्यंत खाली येऊ शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • एनटीपीसी (NTPC)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT