Share Market  Sakal
Share Market

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोणते शेअर्स मिळवून देतील नफा; ट्रेडिंगसाठी पहा यादी

चीनच्या विकासाच्या शक्यतांबद्दल वाढलेली भीती आणि कच्च्या तेलाच्या घटत्या मागणीचाही नकारात्मक परिणाम होत आहे.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: शुक्रवारी बेंचमार्क इंडेक्स सलग दुसऱ्या सत्रात तोट्यासह बंद झाले. निफ्टी 18700 च्या खाली घसरला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 259.52 अंकांनी अर्थात 0.41 टक्क्यांनी घसरून 62979.37 वर आणि निफ्टी 105.80 अंकांनी म्हणजेच 0.56 टक्क्यांनी घसरून 18665.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

युएस फेडने या वर्षी आणखी दर वाढवण्याचे संकेत दिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. ज्यामुळे जागतिक वाढीतील मंदीच्या चिंतेमध्ये भर पडली आहे.

याशिवाय चीनच्या विकासाच्या शक्यतांबद्दल वाढलेली भीती आणि कच्च्या तेलाच्या घटत्या मागणीचाही नकारात्मक परिणाम होत आहे. आठवडाभरात नवीन उच्चांक गाठल्यानंतर, मेटल, ऑईल-गॅस आणि एनर्जी शेअर्समध्ये तीव्र विक्रीने सेन्सेक्स 63000 च्या खाली खेचला.

तांत्रिकदृष्ट्या निफ्टीने इंट्राडे आणि डेली चार्टवर डबल टॉप फॉर्मेशन तयार केले आहे आणि विकली चार्टवर बियरीश कँडल तयार केली आहे जी मोठ्या प्रमाणात नकारात्मक आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • बीपीसीएल (BPCL)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT