share market sakal
Share Market

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Tips: सर्व सेक्टरमधील विक्रीमुळे शुक्रवारी निफ्टी घसरणीसह बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी बाजार लाल चिन्हाने बंद झाला. सर्व सेक्टरमधील विक्रीमुळे निफ्टी 19250 च्या आसपास बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 365.83 अंकांनी अर्थात 0.56 टक्क्यांनी घसरून 64886.51 वर बंद झाला आणि निफ्टी 120.90 अंकांनी म्हणजेच 0.62 टक्क्यांनी घसरून 19265.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंगनंतर दिवसभर अस्थिरता दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी तो 120 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. डेली चार्टवर नजर टाकल्यास मागील ट्रेडिंग सत्रातील विक्रीचा दबाव शुक्रवारीही कायम होता.

विकली चार्टवर, निफ्टी सलग पाचव्या आठवड्यात लाल रंगात बंद झाला. विकली, डेली आणि आवर्ली मोमेंटम इंडिकेटर नेगेटिव्ह क्रॉसओवर दाखवत आहेत. बाजारात विक्री सुरू राहण्याचे हे लक्षण आहे.

अशा प्रकारे, प्राईस आणि मोमेंटम दोन्ही इंडिकेटर्स बाजारात सतत कमजोरी दर्शवत आहेत. अशा स्थितीत निफ्टीबाबत नकारात्मक दृष्टीकोन कायम आहे.

पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये आपण निफ्टी 19100 च्या दिशेने जाताना पाहू शकतो. 19200-19180 मध्ये त्याला सपोर्ट आहे. तर 19360-19400 वर रझिस्टंस आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • एल अँड टी (LT)

  • डॉ. रेड्डी (DRREDDY)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • अदानीपोर्ट्स (ADANIPORTS)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • एमफॅसिस (MPHASIS)

  • ट्रेंट (TRENT)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • पीएनबी (PNB)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT