Share Market Tips Sakal
Share Market

Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कोणते शेअर्स मिळवून देतील नफा; काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

बुधवारी अखेर निफ्टीने आपला सर्वकालीन उच्चांक पार केला.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: बुधवारी अखेर निफ्टीने आपला सर्वकालीन उच्चांक पार केला. जून एक्स्पायरीच्या दिवशी (28 जून) निफ्टीने 19000 चा मोठा अडथळा पार केला.

सेन्सेक्सने 22 जून रोजी केलेल्या 63601.71 च्या मागील उच्चांकाला मागे टाकत नवीन विक्रम नोंदवला. इंट्राडे आधारावर, निफ्टी आणि सेन्सेक्सने 19011.25 आणि 64050.44 च्या विक्रमी उच्चांक गाठला.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 499.39 अंकांनी अर्थात 0.79 टक्क्यांनी वाढून 63915.42 वर बंद झाला. आणि त्याच वेळी, निफ्टी 154.70 अंकांनी म्हणजेच 0.82 टक्क्यांनी वाढून 18972.10 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

28 जून रोजी निफ्टीने सलग दुसऱ्या दिवशी वाढ केली आणि त्याने नवीन उच्चांक गाठल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. शेवटी, तो 0.82 टक्क्यांनी अर्थात 154.7 अंकांनी वाढून 18972.1 वर बंद झाला.

मासिक एफएंडओ एक्स्पायरी दिवशी एनएसईवरील व्हॉल्यूम अलीकडील सरासरीपेक्षा जास्त होते. तथापि, निफ्टीच्या तुलनेत ब्रॉडर मार्केटमध्ये कमी फायदा झाला आहे.

बुधवारी जागतिक बाजारातही तेजी दिसून आली. अमेरिकेच्या चांगल्या आर्थिक बातम्यांमुळे जागतिक वाढीशी संबंधित चिंता कमी झाली आहे.

सध्याची बाजारातील तेजी यापुढेही कायम राहू शकते. सध्याचा अपट्रेंड चालू राहू शकतो. शॉर्ट टर्ममध्ये, निफ्टीसाठी पुढील रझिस्टंस 19000-19200 च्या बँडमध्ये असू शकतो. काही करेक्शन झाल्यास, निफ्टीला 18646 चा सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • सनफार्मा (SUNPHARMA)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT