Share Market Sakal
Share Market

Share Market Today: कालच्या घसरणीनंतर 'या' 10 शेअर्समध्ये करा गुंतवणूक, भरघोस परताव्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Tips: मंगळवारी दिवसभर बाजार अस्थिर राहिला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी दिवसभर बाजार अस्थिर राहिला. सेन्सेक्स निफ्टी किंचित घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 106.98 अंकांनी अर्थात 0.16 टक्क्यांनी घसरून 65846.50 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 26.50 अंकांनी म्हणजेच 0.14 टक्क्यांनी घसरून 19570.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी वाढीसह उघडला, मात्र त्याला या आघाडीचा फायदा उठवता आला नसल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. दिवसभरात घसरण झाली आणि निफ्टी कमजोरीसह बंद झाला. डेली चार्टनुसार गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टीमध्ये काउंटर-ट्रेंड पुलबॅक झाला आहे.

19795 ते 19296 पर्यंतच्या घसरणीदरम्यान, 19645 च्या 20-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेज आणि 61.82% फिबोनाची रिट्रेसमेंट लेव्हल (19605) जवळ रझिस्टंसचा सामना करावा लागला. निफ्टी सध्या करेक्शनच्या प्रक्रियेतून जात आहे आणि यात आलेला पुलबॅक हा 'एक्स' वेव्ह पुलबॅक होता.

आवर्ली मोमेंटम इंडिकेटरमध्ये नेगिटीव्ह क्रॉसओव्हर दिसत आहे जे नकारात्मक संकेत आहे. एकूणच, निफ्टी अजूनही नेगिटीव्ह ट्रेंडमध्ये आहे. शॉर्ट टर्ममध्ये तो 19100 वर जाऊ शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरटेन्मेंट (ADANIENT)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT