Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आजही शेअर बाजारात मंदीचे संकेत, जाणून घ्या कोणत्या शेअर्समध्ये असेल तेजी?

Share Market Investment Tips: काल शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी बाजारात प्रचंड अस्थिरता होती, पण शेवटी तो थोड्या वाढीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 33.21 अंकांनी अर्थात 0.05 टक्क्यांनी वाढून 64,975.61 वर आणि निफ्टी 36.80 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी वाढून 19,443.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी छोट्या ट्रेडिंग रेंजमध्ये राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. ट्रेडर्स आता फेड चेअरमनच्या भाषणाची वाट पाहत आहेत त्यामुळे त्यांच्या अॅक्शनमध्ये संथपणा दिसत होता. पण, निफ्टी महत्त्वाच्या मूव्हिंग एव्हरेजच्यावर बंद झाल्यामुळे सध्याचा तेजीचा कल दिसत आहे.

पुट रायटर्सकडून 19400 च्या पातळीवर सपोर्ट मिळत आहे. अशा स्थितीत निफ्टीला 19400/19300 वर सपोर्ट आणि 19500 वर रेझिस्टन्स दिसतो. या स्तरावर मोठ्या प्रमाणात कॉल रायटर होताना दिसत आहेत.

बँक निफ्टीने बुधवारी दिवसभर साई़़डवेज व्यवहार केला. तरीही, त्याचा कल तेजीचा दिसतो कारण हा इंडेक्स महत्त्वाच्या मूव्हिंग एव्हरेजवर बंद झाला. खाली निफ्टीला 43500 वर सपोर्ट आहे. जोपर्यंत बँक निफ्टी 43500 च्या वर राहील, तोपर्यंत घसरण होण्यावर खरेदीचा सल्ला दिला जाईल. निफ्टी बँक लवकरच 44200 वर जाताना आपण पाहू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बीपीसीएल (BPCL)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • सिप्ला (CIPLA)

  • टायटन (TITAN)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Breaking News Live Update: केडीएमसी अग्निशमन दलातर्फे सायकल रैलीच्या माध्यमातून जनजागृती

Asha Bhosle Passes Away: छातीतील इन्फेक्शनमुळे खरंच कार्डियॅक अरेस्ट येतो का? डॉक्टरांनी सांगितलं काय आहे कनेक्शन

फॅनच्या कृतीनं टीम डेव्हिड वैतागला, हातातला फोन घेतला अन्....; विमानतळावरील Video Viral

IPL 2026, LSG vs GT: शुभमन गिलने जिंकला टॉस; गुजरात - लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय झाले बदल?

SCROLL FOR NEXT