Share Market Sakal
Share Market

Share Market Today: कमकुवत शेअर बाजारात गुंतवणुकीची संधी! आज कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल?

Share Market Tips: बुधवारी बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 19,900 च्या खाली घसरला. इंडेक्स हेवीवेटसह, बहुतेक सेक्टरल इंडेक्समध्ये घसरण झाली. पण पॉवर इंडेक्स वाढीसह बंद झाला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 796 अंकांच्या अर्थात 1.18 टक्क्यांच्या घसरणीसह 66,800.84 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 231.90 अंकांनी म्हणजेच 1.15 टक्क्यांनी घसरून 19,901.40 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीची घसरणीसह सुरुवात झाली आणि 232 अंकांनी घसरून बंद झाला, दिवसभर लाल रंगात व्यवहार झाल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. निफ्टीमध्ये आणखी घसरण होऊ शकते, त्यामुळे ते आणखी 19,840 पर्यंत घसरू शकते. आता निफ्टीला 19,840 - 19,800 वर सपोर्ट आणि 20,050 - 20,100 वर रझिस्टंस दिसून येत आहे.

बँक निफ्टीही बुधवारी करेक्शन मोडमध्ये राहिला. आधीचा हाय स्विंग तोडू शकला नाही, जे घसरणीचे लक्षण आहे. आता बँक निफ्टी 45,070 - 44,930 च्या दिशेने खाली सरकताना दिसू शकेल. निफ्टीला इथे सपोर्ट दिसत आहे. दरम्यान, निफ्टीमध्ये पुल बॅक देखील दिसू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • बीपीसीएल (BPCL)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • झायडस लाईफ (ZYDUSLIFE)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai–Pune Expressway: ३२ तास रस्ता बंद, लोक रस्त्यावर अडकले… राज ठाकरेंनी मागितला टोल परतावा; सरकारच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न

महाराष्ट्राचे १५ आमदार लंडन दौऱ्यावर जाणार, यादी आली समोर; नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

Yashwantrao Chavan Open University : मुक्त विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात राडा! 'आम्ही फक्त टाळ्या वाजवायला आलोय का?' पदवीधरांचा संताप

Tech Tips : लॅपटॉप अन् कॉम्प्युटर खराब होऊ नये असं वाटतं ना? मग कीबोर्डच्या 'या' 10 बटणांना अजिबात हात लावू नका

SCROLL FOR NEXT