Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Hero Motocorp Tech Mahindra HCLTech 17 november 2023 know details  Sakal
Share Market

Share Market Today: आज कोणते शेअर्स मिळवून देतील नफा? तज्ज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Investment Tips: आयटी शेअर्समधील तेजीमुळे सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीत होता

राहुल शेळके

Share Market Investment Tips: आयटी शेअर्समधील तेजीमुळे सलग दुसऱ्या दिवशी अर्थात गुरुवारी भारतीय शेअर बाजार चांगला वधारलेला पाहायला मिळाला. सेन्सेक्स 306 अंकांनी वधारला, निफ्टी 19750 च्या वर गेलेला पाहायला मिळाला.

गुरुवारच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 1.66 लाख करोड रुपयांनी वाढली. BSE वरील मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स देखील अर्ध्या टक्क्यांच्या मजबूत वाढीसह बंद झाले. गुरुवारच्या सत्रात IT सोबत, कन्झ्युमर ड्युरेबल, रियल्टी आणि फार्मा सेक्टर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

गुरुवारच्या सत्रात टेक शेअर्सचे वर्चस्व राहिले. त्यामुळे निफ्टीला वधारण्यास चांगली मदत झाली. मात्र सत्राच्या शेवटच्या तासात निफ्टीने कमावलेला अर्धा फायदा गमावला आणि 89.75 अंकांच्या वाढीसह 19,765.20 वर बंद झाला. गुरुवारी, IT व्यतिरिक्त, रियल्टी आणि फार्मा क्षेत्रांनी देखील सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह चांगली कामगिरी केली.

आज कशी असेल बाजाराची चाल?

डेरिव्हेटीव्ह आणि टेक्निकल अनॅलिस्ट अवधूत बागकर यांच्या मते, निफ्टीमध्ये तेजी येण्यासाठी 19850 वर मजबूत क्लोजिंग द्यावी लागेल. असं झाल्यास निफ्टी नव्या ऐतिहासिक उच्चांकाला गाठण्याची शक्यता आहे. सध्या निफ्टीला 19500 वर सपोर्ट पाहायला मिळतोय, जोवर हा सपोर्ट कायम राहील तोवर निफ्टीमध्ये तेजीची शक्यता कायम राहील.

आज 'या' शेअर्सवर ठेवा नजर

  1. हिरो मोटोकॉर्प - HEROMOTOCO

  2. टेक महिंद्रा - TECHM

  3. एचसीएल टेक - HCLTECH

  4. टीसीएस - TCS

  5. इन्फोसिस - INFY

  6. कोफोर्ज - COFORGE

  7. एम्फसिस - MPHASIS

  8. पॉलिकॅब - POLYCAB

  9. जुबिलंट फूड - JUBLFOOD

  10. आयडीएफसी फर्स्ट बँक - IDFCFIRSTB

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT