Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Tips: गुरुवारी भारतीय बाजार घसरणीसह बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: गुरुवारी भारतीय बाजार घसरणीसह बंद झाले. प्रचंड अस्थिरतेमध्ये निफ्टी 19800 च्या खाली बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 64.66 अंकांनी अर्थात 0.10 टक्क्यांनी घसरून 66408.39 वर आणि निफ्टी 17.30 अंकांनी म्हणजेच 0.09 टक्क्यांनी घसरून 19794 वर पोहोचला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी गुरुवारी सपाट ट्रेंडसह उघडला आणि दिवसाचा बहुतांश भाग कंसोलिडेट होत राहिल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. शेवटी तो 17 अंकांच्या किंचित घसरणीसह लाल रंगात बंद झाला. डेली चार्टवरून स्पष्ट होते की गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी 350 अंकांच्या तीव्र वाढीनंतर मजबूत होत आहे. हे कंसोलिडेशन चांगले संकेत आहे.

आवर्ली मोमेंटम इंडिकेटर नेगिटीव्ह क्रॉसओव्हरमध्ये आहे. यामुळे आणखी कंसोलिडेशन होऊ शकते. अशा परिस्थितीत, जर 19750 – 19730 च्या झोनमध्ये घसरण होत असेल, तर त्याकडे खरेदीची संधी म्हणून पाहिजे असेही ते म्हणाले. 19718-19757 वर शॉर्ट टर्म सपोर्ट आहे. कोणत्याही तेजीमध्ये निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 19884-20030 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • इन्फोसिस (INFY)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • टीसीएस (TCS)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • एम फॅसिस (MPHASIS)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT