Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: इंट्राडेमध्ये कमाईची सुवर्णसंधी, तुमच्या यादीत ठेवा हे 10 शेअर्स

Share Market Today: शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण झाली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण दिसून आली. निफ्टी 19550 च्या आसपास बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 231.62 अंकांनी अर्थात 0.35 टक्क्यांनी घसरून 65397.62 वर आणि निफ्टी 82.00 अंकांनी म्हणजेच 0.42 टक्क्यांनी घसरून 19542.70 वर पोहोचला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

कमकुवत जागतिक संकेत आणि वाढत्या कमोडिटी प्राईसमुळे बाजार घसरणीसह बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत राहिल्यास, गुंतवणूकदार चिंताग्रस्त होतील आणि देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये प्रॉफीट-बुकिंग दिसू शकेल असेही ते म्हणाले.

तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने डेली आणि इंट्राडे चार्टवर डबल टॉप फॉर्मेशन तयार केले. या रिव्हर्सलनंतर, निफ्टी 20 आणि 50 दिवसांच्या एसएमए अर्थात सिंपल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेडिंग करत आहे.

निफ्टीने विकली चार्टवर बियरिश कँडल तयार केली आहे जी येत्या काळात घसरण कायम राहण्याचे संकेत आहेत. जोपर्यंत निफ्टी 20 दिवसांच्या एसएमएखाली ट्रेडिंग करत आहे तोपर्यंत कमजोरी कायम राहण्याची शक्यता आहे.

ट्रेडर्ससाठी, 19700 वर रझिस्टंस असेल आणि त्या खाली टिकून राहिल्याने निफ्टी 19450-19350 पर्यंत घसरेल. दुसरीकडे, जर ते 19700 किंवा 20 दिवसांच्या एसएमएच्या वर गेले तर ते पुन्हा 19800-19850 ची लेव्हल दिसू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • आयटीसी (ITC)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • बीपीसीएल (BPCL)

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • सिप्ला (CIPLA)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • पेज इंडिया (PAGEIND)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT