Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: बाजारातील तेजीच्या काळात कोणते शेअर्स मिळवून देतील नफा? तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Tips: काल निफ्टी विक्रमी पातळीवर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: सोमवारी सलग सातव्या दिवशी शेअर बाजारात तेजी कायम राहिली. निफ्टी विक्रमी पातळीवर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 528.17 अंकांनी अर्थात 0.79 टक्क्यांनी वाढून 67127.08 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 176.30 अंकांनी म्हणजेच 0.89 टक्क्यांनी वाढून 19996.30 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

जागतिक मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थिती कमजोर असूनही, भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. त्यामुळे बेंचमार्क निफ्टी 20,000 च्या वर जाताना दिसत आहे.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची सततची विक्री, महागाई, डॉलरची मजबूती, अमेरिकेच्या ट्रेझरी यील्डमध्ये वाढ आणि व्याजदरात वाढ यासारख्या चिंतेनंतरही भारतीय बाजारात सलग सातव्या सत्रात तेजी दिसून आली. मात्र, यावेळी बाजार ओव्हरबोट दिसत आहे, त्यामुळे सतर्क राहण्याचे संकेतही त्यांनी दिलेत.

तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास बेंचमार्क निफ्टी शॉर्ट टर्मसाठी मजबूत स्थितीत आहे. डेली चार्टवर त्याने बुलिश कँडलस्टिक तयार केली आहे आणि इंट्राडे चार्टवर त्याने सतत हायर हाय आणि हायर लो सिरीज कायम ठेवली आहे जी मोठ्या प्रमाणात सकारात्मक आहे.

सध्या 19935 वर सपोर्टा दिसत आहे. याच्या वर राहिल्यास निफ्टी 20100-20175 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, 19935 च्या खाली गेल्यास घसरण होऊ शकते. त्यानंतर निफ्टीमध्ये 19850-19825 पर्यंत करेक्शन दिसून येईल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • पॉवर ग्रीड (POWERGRID)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • पीएनबी (PNB)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: आता पालकांना मोबाईलवर दिसणार शाळेची बस; महाराष्ट्रात नवे नियम लागू, नियम न पाळल्यास परमिट रद्द होणार

FDA Crackdown: एफडीए कारवाईवर उच्च न्यायालयाची झापड; पंचतारांकित हॉटेलला दिलासा, परवाना निलंबन पुनर्विचाराचा आदेश

Gangapur Water Supply: नऊ वर्षांनंतर गंगापूरचे जलशुद्धीकरण केंद्र सुरू; वाढत्या लोकसंख्येसाठी ८.५ एमएलडी नवीन पाणीपुरवठा योजनेची तयारी

मुलीच्या प्रेमविवाहाचा राग; तरुणाला बेदम मारहाण, जळत्या चितेवर फेकून दिलं...

Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक कुटुंबासाठी स्वतःची स्वप्नं ठेवतात बाजूला; पण नशीब त्यांना उशिरा का होईना देतं मोठं फळ

SCROLL FOR NEXT