Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Sun Pharma ONGC MRF 1 november 2023 know details  Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात पैसे कमावण्यासाठी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? तज्ज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Investment Tips: एफआयआयच्या सततच्या विक्रीमुळे भारतीय बाजार घसरल्याचे दिसून येत आहे.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी अतिशय चढ - उतारांमध्ये निफ्टी लाल रंगात बंद झाला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली तेजी मंगळवारी ठप्प झाली. निफ्टी 19100 च्या खाली बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 237.72 अंकांनी अर्थात 0.37 टक्क्यांनी घसरून 63874.93 वर बंद झाला आणि निफ्टी 61.30 अंकांनी म्हणजेच 0.32 टक्क्यांनी घसरून 19079.60 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँकिंग, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजार दबावाखाली राहिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. आशियाई बाजारातील कमजोरीमुळे बाजाराचा मूड खराब झाला. इतर देशांच्या तुलनेत भारतीय बाजार भक्कम असले तरी, गेल्या एक महिन्यापासून एफआयआयच्या सततच्या विक्रीमुळे भारतीय बाजार घसरल्याचे दिसून येत आहे.

येत्या काळात बाजारात संमिश्र कल पाहू शकतो. डेली चार्टवर, निफ्टीने बियरीश कँडल तयार केली आहे जी सध्याच्या पातळीपासून आणखी कमजोरी दर्शवत आहे. आता बाजार 18980 ते 19220 च्या रेंजमध्ये मजबूत होताना दिसू शकतो. पण, 18980 च्या खाली गेल्यास दबाव आणखी वाढू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • सनफार्मा (SUNPHARMA)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • एलटी माइंडट्री लिमिटेड (LTIM)

  • ओएनजीसी (ONGC)

  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)

  • एमफॅसिस (MPHASIS)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • एमआरएफ (MRF)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT