Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: सलग सात दिवसांची तेजी बाजारात कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: अमेरिकेच्या व्याजदर कपातीच्या अपेक्षेने विदेशी गुंतवणूकही वाढत आहे

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी बाजार वाढीसह बंद झाला. निफ्टी 20,950 च्या आसपास बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 357.59 अंकांच्या अर्थात 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 69,653.73 वर बंद झाला आणि निफ्टी 82.60 अंकांच्या म्हणजेच 0.40 टक्क्यांच्या वाढीसह 20,937.70 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

राजकीय अनिश्चिततेमुळे सुरुवातीला सावध असलेले एफपीआय आता खरेदी करताना दिसत असल्याचे एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसचे जयकृष्ण गांधी म्हणाले. या आठवड्यात इंडेक्समधील 3.5 टक्क्यांच्या तेजीत फायनान्शियल शेअर्स आणि अदानी समूहाच्या कंपन्यांनी आघाडीची भूमिका बजावली आहे. देशाच्या विकासाच्या चांगल्या आकड्यांनीही बाजारात उत्साह आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत नुकत्याच झालेल्या घसरणीमुळे महागाईची चिंता कमी झाली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या व्याजदर कपातीच्या अपेक्षेने विदेशी गुंतवणूकही वाढत आहे, ज्यामुळे बाजाराला आणखी चालना मिळू शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • विप्रो (WIPRO)

  • एलटी माइंडट्री (LTIM)

  • आयटीसी (ITC)

  • एल अ‍ॅण्ड टी (LT)

  • टीसीएस (TCS)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आंदोलनाची वेळ संपली, कोर्टाचा आदेश घेऊन पोलिस आंदोलनस्थळी दाखल

Mumbai Metro: आता गर्दीला रामराम! मेट्रो प्रवाशांसाठी भूमिगत वॉकवेची भन्नाट योजना, नवीन आठ प्रस्तावांना मंजुरी

Family Pension Rules: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून कुटुंब पेन्शनसाठी नवीन नियम जारी, आता मुलांना वडिलांची पेन्शन कधी मिळणार? वाचा...

'सर... माझं ब्रेकअप झालय' Gen Z कर्मचाऱ्याने बॉसला पाठवला मेल, बॉसला दया आली आणि १० दिवसांची सुट्टी मंजूर झाली

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी शरद पवार पक्ष रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व ५९ जागांवर निवडणूक लढवणार

SCROLL FOR NEXT