Share Market Investment Tips Esakal
Share Market

Share Market Investment Tips: आज शेअर बाजारात हे 10 शेअर्स मिळवून देतील नफा; काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

बुधवारी शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाला.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: बुधवारी शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाला. फेड रेट निर्णयापूर्वी गुंतवणूकदार सावध झाले म्हणून नफा माफक राहिला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 85.35 अंकांनी अर्थात 0.14 टक्क्यांनी वाढून 63,228.51 वर आणि निफ्टी 39.70 अंकांनी म्हणजेच 0.21 टक्क्यांनी वाढून 18755.90 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

आज येणाऱ्या यूएस एफओएमसी बैठकीच्या निकालापूर्वी बाजारांनी सावधगिरी बाळगली, पण मेटल आणि ऑईल-गॅस शेअर्समध्ये निवडक खरेदीमुळे बाजार बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.

तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीने 18700 च्या जवळ सपोर्ट घेतला आणि मजबूत रिकव्हरी दाखवली. पण निफ्टी 18775 ची महत्त्वपूर्ण पातळी ओलांडण्यात अपयशी ठरला. बाजाराचा शॉर्ट टर्म ट्रेंड तेजीचा आहे, पण जर निफ्टी 18700 च्या खाली घसरला तर त्यात इंट्राडे करेक्शन दिसू शकते.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

  • ग्रासिम (GRASIM)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT