Share Market Today Sakal
Share Market

Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

बुधवारीही बाजारात प्रॉफिट बुकींग सुरूच राहिल्याने निफ्टी 18200 च्या खाली बंद झाला.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: बुधवारीही बाजारात प्रॉफिट बुकींग सुरूच राहिल्याने निफ्टी 18200 च्या खाली बंद झाला. जागतिक बाजारातील संमिश्र संकेत आणि यूएस कर्ज मर्यादा संकटांचा बाजारावर परिणाम दिसून आला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 371.83 अंकांनी अर्थात 0.60 टक्क्यांनी घसरून 61560.64 वर आणि निफ्टी 104.70 अंकांनी म्हणजेच 0.57 टक्क्यांनी घसरून 18181.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बुधवारी बाजार नकारात्मक क्षेत्रात राहिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या तेजीनंतर सावध गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक करणे सुरू ठेवले.

अमेरिका आणि चीनमधून येणारा कमकुवत आर्थिक डेटा पुन्हा एकदा मंदीची भीती वाढवत आहे. यामुळे गुंतवणूकदार बाजार आणि अर्थव्यवस्थेच्या पुढच्या दृष्टिकोनाबद्दल चिंतेत आहेत.

तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाले तर निफ्टीने 18250 ची महत्त्वाची सपोर्ट लेव्हल मोडली आहे. यासह, डेली चार्टवर एक बियरीश कँडल तयार केली आहे जी नकारात्मक संकेत देत आहे. 18250 आणि 18300 ला रझिस्टंस दिसत आहे, तर 18100-18050 ची पातळी सपोर्ट म्हणून काम करू शकते.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • टीसीएस (TCS)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Crime: पुण्यात कौटुंबिक वादातून गोळीबार; कसबा पेठेत ३० वर्षीय पती जखमी, घटनास्थळी शस्त्र सापडले

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

Hospital Fire: अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूने भंडाऱ्याची ‘ती’ काळरात्र पुन्हा ताजी; २०२१ मध्ये १० बालकांचा आगीत मृत्यू

आनंदाची बातमी! पुण्यात १३ लाखांत मिळणार घर, म्हाडाकडून ४४६२ घरांसाठी लॉटरी जाहीर

SCROLL FOR NEXT