Share Market  Sakal
Share Market

Share Market Investment Tips: कालच्या प्रॉफीट बुकींगनंतर आज कोणते शेअर्स मिळवून देतील नफा; काय सांगतात तज्ज्ञ?

जागतिक आव्हानांमुळे, बाजारात नियमित अंतराने विक्री दिसत आहे.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: सोमवारी बाजारात प्रॉफीट बुकींग दिसून आले. एनर्जी, रिऍल्टी आणि बँकिंग शेअर्समध्ये विक्री झाली. ऑटो, एफएमसीजी आणि मेटल शेअर्सवर दबाव दिसून आला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 216.28 अंकांनी अर्थात 0.34 टक्क्यांनी घसरून 63168.30 वर बंद झाला आणि निफ्टी 70.50 अंकांनी म्हणजेच 0.37 टक्क्यांनी घसरून 18755.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

शेअर बाजारात जोखीम टाळण्याची भावना भारतीय बाजारपेठेत दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.

जागतिक शेअर बाजारातील विक्रीमुळे बँकिंग, ऑटो, टेलिकॉम आणि एफएमसीजी शेअर्समध्ये प्रॉफीट बुकींग झाली. पण, भारताचे मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर योग्य मार्गावर असल्याचे दिसते.

जागतिक आव्हानांमुळे, बाजारात नियमित अंतराने विक्रीचे स्पेल दिसेल. इंट्राडे चार्टवर, निफ्टी हायर हाय आणि हायर लो सिरिज फॉर्मेशन तयार करत आहे, जो सध्याच्या पातळीपासून तेजीचे संकेत देत आहे. 18680 वर सपोर्ट दिसत आहे.

जर निफ्टीने हा सपोर्ट कायम ठेवला तर ही तेजी पुन्हा 18850-18900 पातळीची चाचणी घेऊ शकते. दुसरीकडे, जर तो 18680 च्या खाली घसरला तर घसरण वाढू शकते, ज्यामुळे निफ्टी इंडेक्स 18650-18610 पर्यंत घसरू शकतो.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT