Share Market  Sakal
Share Market

Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

Share Market Investment Tips: बुधवारी सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद झाले.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: बुधवारी सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद झाले. निफ्टी 17800 च्या वर बंद करण्यात यशस्वी झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 169.87 अंकांनी अर्थात 0.28 टक्क्यांनी वाढून 60300.58 वर आणि निफ्टी 44.30 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढून 17813.60 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

गुरुवारी मंथली एफ अँड ओ एक्सपायरीआधी गुंतवणूकदार त्यांच्या पोझिशन्स कव्हर करतील असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. बाजार सध्या जागतिक कमकुवतपणाकडे दुर्लक्ष करत आहे.

याचा सरळ अर्थ असा की भारतीय बाजाराच्या फंडामेंटल्स मजबूत आहेत आणि गुंतवणूकदार भारतीय इक्विटीमध्ये जोखीम घेण्यास तयार आहेत. पण पुढील महिन्यात यूएस फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीपूर्वी, बाजार सावधगिरी बाळगण्यासाठी जागतिक बाजारांकडून संकेत घेऊ शकतो.

बाजार 17700-17830 च्या प्राइस रेंजमध्ये व्यवहार करत आहे. आता 17830 रेंज बुल्ससाठी ब्रेकआउट झोन असेल. याच्या वर सेन्सेक्स 17900-17950 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, जर ते 17700 च्या खाली घसरले तर विक्रीचा दबाव वाढू शकतो. असे झाल्यास, इंडेक्स 17650-17625 पर्यंत जाऊ शकतो.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shanivarwada Controversy : शनिवारवाड्यासमोर तणाव वाढला! 'त्या' व्हिडीओनंतर मेधा कुलकर्णींसह हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आक्रमक

Metro 2B: मेट्रो-२ बीचा पहिला टप्पा कधी सुरू होणार? तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या मार्ग...

Electricity Supply: मुंबईसह राज्याची विजेची मागणी घसरली, सुमारे ३-४ हजार मेगावॉटची घट; नेमकं कारण काय? वाचा...

Beed News : बीडमधील गेवराईत धनगर आरक्षणाचा बळी, एसटी प्रवर्गात समावेश होत नसल्याने मादळमोहीच्या युवकाने घेतला गळफास

AUS vs IND: मोहम्मद सिराजची सुपरमॅनसारखी फिल्डिंग! बाऊंड्रीजवळ एकाच हाताने चेंडू पकडून आडवला सिक्स, पाहा Video

SCROLL FOR NEXT