Share Market Investment Tips  sakal
Share Market

Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

मंगळवारी मोठ्या उलथापालथीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी लाल चिन्हावर बंद झाले.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Investment Tips : मंगळवारी मोठ्या उलथापालथीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी लाल चिन्हावर बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 40.14 अंकांनी म्हणजेच 0.07 टक्क्यांनी घसरून 57613.72 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 34 अंकांच्या म्हणजेच 0.20 टक्क्यांच्या कमजोरीसह 16951.70 च्या पातळीवर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

तांत्रिक दृष्टिकोनातून निफ्टी गेल्या तीन दिवसांपासून 16900 च्या आसपास सपोर्ट घेत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. त्याच वेळी, 17100 च्या आसपास रझिस्टंस दिसत आहे. निफ्टीला 16900 वर अजूनही सपोर्ट आहे.

पुलबॅकमध्ये, निफ्टी पुन्हा 17050-17100 पातळीची टेस्ट घेऊ शकतो. दुसरीकडे, जर निफ्टीने 16900 ची पातळी तोडली तर ही घसरण 16820-16800 पर्यंत वाढू शकते.

निफ्टी मंगळवारीही रेंजमध्ये फिरताना दिसल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. सलग तिसर्‍या दिवशी 16900-17100 च्या रेंजमध्ये तो कंसोलिडेट होताना दिसला.

आवर्ली चार्टवर, निफ्टी 16910 - 16970 च्या रेंजमध्ये फिरताना दिसतो. निफ्टीसाठी हा मेक अँड ब्रेक झोन आहे. निफ्टीमध्ये पुल बॅक रॅली असेल तर ती या झोनमधून येईल.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • ट्रेंट (TRENT)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 मिळतोय निम्म्या किंमतीत! ४४ हजारात खरेदीसाठी रांगा; कुठे सुरुय ही अजब ऑफर? पाहा एका क्लिकवर

Solapur Hyderabad Flight : सोलापूरकरांसाठी गूड न्यूज! 17 एप्रिलपासून विमान प्रवासाचं गणित बदलणार; पहा नवीन वेळापत्रक

'कमळी' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री; म्युझिक टिचर बनून येतेय सगळ्यांना वेड लावणारी गायिका, चाहते खुश

Yuvraj Singh: 'धोनी अचानक आला, भारताचा कॅप्टन झाला, त्यावेळी मी...', युवराजचं थेट भाष्य; निवृत्तीबाबतही केला धक्कादायक खुलासा

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

SCROLL FOR NEXT