Share Market  Sakal
Share Market

Share Market Investment Tips: आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

कालच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीची सपाट क्लोजिंग झालेलं पाहायला मिळाले

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: फिन निफ्टीच्या एक्सपायरीच्या दिवशी म्हणजेच काल, मंगळवारी भारतीय शेअर बाजार एका रेंजमध्ये ट्रेड करताना पाहायला मिळाला. कालच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीची सपाट क्लोजिंग झालेलं पाहायला मिळाले.

रिऍलिटी, ऑटो, फार्मा सेक्टरमधील शेअर्समध्ये खरेदी पाहायला मिळाली, सोबतच PSE आणि इन्फ्रा सेक्टर्सदेखील वधारलेले पाहायला मिळाले. तर, दुसरीकडे IT सेक्टरमध्ये विक्री पाहायला मिळाली आणि सोबतच एनर्जी आणि मेटल सेक्टरवरही दबाव असल्याचं पाहायला मिळालं.

काल दिवसाअखेर सेन्सेक्स 5.41अंक म्हणजेच 0.01 टक्क्यांच्या वाढीसह 62,792.88 या स्तरावर बंद झाला. तर निफ्टी 5.15 अंक म्हणजेच 0.03 टक्के वाढीसह 18,599 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

LKP सिक्युरिटीचे रूपक डे यांच्यामते निफ्टीमध्ये वरच्या बाजूला चढाव आणि उतार पाहायला मिळाला. मात्र संपूर्ण दिवस निफ्टी एका लहानशा टप्प्यात काम करताना दिसला.

डेली चार्टवर जी कँडल तयार झाली आहे ती अनिश्चितता दर्शवणारी आहे, त्यामुळे आजच्या सत्रातही निफ्टी साईडवेज पाहायला मिळू शकतो. खाली 18500 वर सपोर्ट तर वरील बाजूस 18665 ची लेव्हल रेझिस्टन्सची आहे.

जर निफ्टीने 18700 च्या वर एक मजबूत ब्रेकआऊट दिला येत्या काळात निफ्टी रेकॉर्ड हायपर्यंत मजल मारू शकतो असा अंदाज रेलिगेअर ब्रोकिंगच्या अजित मिश्रा यांनी लावला आहे

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • डिव्हीस लॅब (DIVISLAB)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • ग्रासिम (GRASIM)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • हिंद पेट्रो (HINDPETRO)

  • कमिन्स इंडीया (CUMMINSIND)

  • एस्ट्रल (ASTRAL)

  • बालक्रिष्णा इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT