Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Investment Tips: काल शेअर बाजार तेजीसह बंद झाल्याने आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

आरबीआय एमपीसी निकालाच्या एक दिवस आधी अर्थात बुधवारी 2023 वर्षात निफ्टी पहिल्यांदा 18700 पार करताना दिसला.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: बुधवारी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आरबीआय एमपीसी निकालाच्या एक दिवस आधी अर्थात बुधवारी 2023 वर्षात निफ्टी पहिल्यांदा 18700 पार करताना दिसला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 350.08 अंकांनी अर्थात 0.56 टक्क्यांनी वाढून 63142.96 वर बंद झाला आणि निफ्टी 127.40 अंकांनी म्हणजेच 0.68 टक्क्यांनी वाढून 18726.40 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

क्रेडिट पॉलिसीच्या एक दिवस आधी, अर्थात बुधवारी बाजारात व्यापक-आधारित रॅली होती आणि सेन्सेक्स 63000 च्या वर बंद होण्यात यशस्वी झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.

तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास, निफ्टीने 18650 चा रझिस्टंस ओलांडल्याने बाजारातील मूड सुधारला आहे. एक बुलिश कँडल ऑन झाल्याने आणि हायर बॉटम फॉर्मेशनमुळे बाजारात आणखी चढ-उतार दिसत आहे.

ब्रेकआउट ट्रेडर्स 18650 च्या पातळीला मोठा सपोर्ट म्हणून पाहत आहेत. हा सपोर्ट कायम राहिल्यास निफ्टी 18800-18875 या पातळीकडे वाटचाल करु शकेल. दुसरीकडे, जर हा सपोर्ट तुटला तर ही घसरण 18600-18550 पर्यंत जाऊ शकते.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • ब्रिटानिया (BRITANNIA)

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

  • बीपीसीएल (BPCL)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस, गणपती काळात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार घ्या जाणून

घटस्फोटाच्या ११ वर्षानंतर पुन्हा लग्न करायला तयार आहे तेजश्री प्रधान; अखेर मनातलं सांगितलंच, म्हणते-

US Midterm Elections: अमेरिकेतही ‘लाडकी’ योजना; मध्यावधीसाठी पाच हजार डॉलर देण्याचे ट्रम्प यांचे आश्वासन

Latest Marathi News Live Update : रेल्वेचा रविवारी नऊ तासांचा 'ब्लॉक' लोकलसह मुंबई-पुणे,पुणे-दौंड एक्स्प्रेस-डेमू रद्द

नवी मुंबई विमानतळावरून तिकीटदर कमी होणार? लँडिंग शुल्कात १०० टक्के सवलत, प्रशासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT