Share Market Closing  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजाराचे कमबॅक; सेन्सेक्स 81,634 अंकांवर बंद, मिडकॅप निर्देशांकात मोठी वाढ

Share Market Closing Today: गेल्या आठवड्यापासून सलग सहा दिवसांच्या विक्रीनंतर आज मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजाराने कमबॅक केले आहे. सेन्सेक्स-निफ्टी चांगल्या वाढीसह बंद झाले आहेत. मिडकॅप-स्मॉलकॅप निर्देशांकानेही पूर्वीची घसरण जवळपास सावरली आहे.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 8 October 2024: गेल्या आठवड्यापासून सलग सहा दिवसांच्या विक्रीनंतर आज मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजाराने कमबॅक केलं आहे. सेन्सेक्स-निफ्टी चांगल्या वाढीसह बंद झाले आहेत. मिडकॅप-स्मॉलकॅप निर्देशांकानेही पूर्वीची घसरण जवळपास सावरली आहे. निफ्टी 217 अंकांनी वाढून 25,013 वर बंद झाला. सेन्सेक्स 584 अंकांनी वाढून 81,634 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 542 अंकांनी वाढून 51,021 वर बंद झाला.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर शेअर बाजारानेही उसळी घेतली. सलग सहा दिवसांच्या विक्रीनंतर बाजाराला ब्रेक लागला आणि गुंतवणूकदारांनी खरेदीकडे वळल्यामुळे बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला. बँकिंग ऑटो , मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी झाली.

Share Market Closing
क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात मिडकॅप शेअर्समध्ये प्रचंड खरेदी दिसून आली आणि निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 1235 अंकांच्या उसळीसह 58,535 अंकांवर बंद झाला. स्मॉलकॅप शेअर्समध्येही चमक दिसून आली आणि निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 374 अंकांच्या किंवा 2.05 टक्क्यांच्या वाढीसह 18,617 अंकांवर बंद झाला.

Share Market Closing

बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा एफएसीजी, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. केवळ मेटल क्षेत्राच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

BSE SENSEX
कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 11 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 36 शेअर्स वाढीसह तर 14 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

वाढत्या शेअर्समध्ये अदानी पोर्ट्स 4.76 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 3.42 टक्के, रिलायन्स 2.01 टक्के, एचडीएफसी बँक 1.95 टक्के, एल अँड टी 1.83 टक्के, एसबीआय 1.59 टक्के, एनटीपीसी 1.42 टक्के वाढीसह बंद झाले.

घसरणाऱ्या शेअर्समध्ये टाटा स्टील 2.89 टक्के, टायटन 2.37 टक्के, बजाज फिनसर्व्ह 2.27 टक्के, बजाज फायनान्स 1.12 टक्के, टाटा मोटर्स 0.89 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8 लाख कोटींची वाढ

शेअर बाजारात पुन्हा तेजी आल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर कंपन्यांच्या शेअर्सचे मार्केट कॅप 459.78 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, मागील सत्रात मार्केट कॅप 451.99 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आज मार्केट कॅपमध्ये सुमारे 8 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारने आतापर्यंत किती रुपये खर्च केले? या पैशातून करता आली असती 'ही' मोठी कामे

LPG Alternative : LPG च्या टेन्शनपासून होणार सुटका ! आता एका क्लिकवर मिळणार PNG कनेक्शन, गॅसचा खर्चही होणार कमी, काय आहे सरकारची योजना?

Kolhapur Rape Case : ओळखपत्र करून देण्याचा बहाणा, तरुणीवर सामूहिक वारंवार अत्याचार; फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी, पोलिसांनी मोबाईल घेतला अन्

Latest Marathi News Live Update : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, अनेक सखल भागांत पाणी साचले

Shirol Tehsildar protest : शिरोळ तहसीलदारांसह पाच अधिकाऱ्यांना कोंडले, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी आंदोलक संतप्त

SCROLL FOR NEXT