Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market : 'या' स्मॉल कॅप स्टॉकमध्ये एका वर्षात 10 पट वाढ, आता बोनस शेअर्सची केली घोषणा

कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 24:100 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Investment Tips : ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडियाचे (Growington Ventures India) शेअर्स मल्टीबॅगर शेअर्सच्या लिस्टमध्ये सामिल झालेत. या स्मॉल-कॅप स्टॉकने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 908.06 टक्के बंपर परतावा दिला आहे.

आता कंपनीने आपल्या पात्र भागधारकांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने 24:100 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. याचा अर्थ कंपनी प्रत्येक 100 शेअर्समागे 24 बोनस शेअर्स जारी करेल.

ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडियाने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यातच त्याचे शेअर्स 30 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत ते 81 टक्क्यांनी वाढले आहे.

या वर्षी आतापर्यंत स्टॉकने 84 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 908 टक्के परतावा दिला आहे.

ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडियाच्या एका शेअरची किंमत मार्च 2022 मध्ये 9.92 रुपये होती. जी आता 100 रुपयांवर पोहोचली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या पैशात अवघ्या एका वर्षात 10 पट वाढ झाली आहे. जर तुम्ही मार्च 2022 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 10 लाख झाली असती.

ग्रोइंग्टन व्हेंचर्स इंडिया लिमिटेड ही कंपनी आधी व्हीएमव्ही हॉलिडेज लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. ही कोलकातामध्ये ट्रॅव्हल एजन्सी म्हणून काम करते.

कंपनी विमान तिकीट बुकिंग, टूर पॅकेज, हॉटेल आणि रिसॉर्ट बुकिंग, कार रेंटल सर्व्हिस, व्हिसा, इव्हेंट मॅनेजमेंट आणि वेडिंग प्लानिंगसह प्रवास आणि पर्यटनाशी संबंधित सेवा देते. कंपनी देशांतर्गत टूर पॅकेजेस आणि आंतरराष्ट्रीय टूर पॅकेजेसही ऑफर करते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT