Finolex share price analysis sakal
Share Market

Finolex Industries : फिनोलेक्सच्या शेअर्समध्ये तज्ज्ञांकडून तेजीचा कल

देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने फिनोलेक्सच्या शेअर्सवर 196 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Finolex share price analysis : कृषी क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या पीव्हीसी पाईप्सची सर्वात मोठी कंपनी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे (Finolex Industries) शेअर्स यावर्षी सुमारे 10 टक्क्यांनी कमजोर झालेत. पण, लाँग टर्मचा विचार केल्यास त्याने कमी पैशात गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

यापुढेही या शेअर्समध्ये शेअर मार्केट एक्सपर्ट्सना तेजीचा कल दिसत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने फिनोलेक्सच्या शेअर्सवर 196 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. सध्या हे शेअर्स बीएसईवर 169.75 रुपयांवर आहेत. (share market news Finolex Industries share increased read what expert said)

मोठ्या घसरणीनंतर पीव्हीसीच्या किमती पुन्हा वाढत आहेत, त्यामुळे डीलर्स पुन्हा रिस्टॉक करत आहेत. यामुळे डिसेंबर 2022 च्या तिमाहीनंतर आता या तिमाहीत जानेवारी-मार्च 2023 मध्ये कृषी पाईप्सच्या मागणीत तेजी येण्याची शक्यता आहे.

याशिवाय, लागवडीचा हंगाम पुन्हा सुरू होणार आहे, त्यामुळे मार्चमध्ये त्याची मागणी जोर धरू शकते. या सर्व गोष्टींमुळे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने फिनोलेक्सवरचे आपले रेटिंग ऍडवरुन 196 रुपयांच्या टारगेटसाठी अपग्रेड केले आहे.

गेल्या वर्षी 12 मे 2022 रोजी त्याची किंमत 128 रुपये होती, जी एका वर्षातील नीचांकी आहे. यानंतर खरेदी वाढली आणि पुढील सात महिन्यांत 29 डिसेंबर 2022 पर्यंत ती 52 टक्क्यांनी वाढून 194.95 रुपयांवर पोहोचली. मात्र, शेअर्समधील तेजी थांबली आणि आतापर्यंत ती 13 टक्क्यांनी घसरली आहे.

25 सप्टेंबर 1998 रोजी फिनोलेक्सचे शेअर्स केवळ 99 पैशांना होते. आता ते 169.75 रुपयांवर गेलेत, म्हणजे त्यात 171 पटीने वाढ झाली आहे. 25 वर्षांत केवळ 59 हजारांच्या गुंतवणुकीवर या शेअर्सने गुंतवणूकदारांना कोट्यीश बनवले आहे. फिनोलेक्सने केवळ लाँग टर्म नाही तर शॉर्ट टर्ममध्ये दमदार परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईत ऐन दिवाळीत दुर्घटना, चाळीत आग लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघे जखमी

Nagpur Fraud: नागपूर शहरात घट्ट होतोय ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा; सेवानिवृत्त अधिकारी टार्गेट; ७५ लाखांपेक्षा अधिकची फसवणूक

Latest Marathi News Live Update : मधुराईत कागद आणि भंगार धातू साठवणाऱ्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव

उपोषणस्थळी भेटायला वेळ नाही, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस, शिंदेंच्या मंत्र्यांची असंवेदनशीलता

शाहिद आफ्रिदीने 'लायकी' दाखवली! अफगाणिस्तानला उपकाराची आठवण करून दिली ; म्हणतो, आम्ही तुम्हाला पोसतोय...

SCROLL FOR NEXT