Sensex opens Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स 72500 पार, निफ्टीही वधारला

Share Market Opening: सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांकांची सुरुवात वाढीसह झाली. सेन्सेक्स 72,627 वर आणि निफ्टी 22,103 वर उघडला. सरकारी बँकिंग आणि फार्मा क्षेत्रात जोरदार खरेदी आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 19 February 2024: सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांकांची सुरुवात वाढीसह झाली. सेन्सेक्स 72,627 वर आणि निफ्टी 22,103 वर उघडला. सरकारी बँकिंग आणि फार्मा क्षेत्रात जोरदार खरेदी आहे. निफ्टीमध्ये बजाज ऑटो 2.5% च्या वाढीसह टॉप गेनर आहे.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी बँक निर्देशांक तेजीत होते तर निफ्टी आयटी निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते.

निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांकही तेजीत होते. सोमवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बजाज ऑटो, अदानी एंटरप्रायझेस, डॉ. रेड्डीज लॅब, अदानी पोर्ट, एनटीपीसी आणि बीपीसीएलचे शेअर्स वधारले.

शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात

कोणते शेअर्स घसरले?

शेअर बाजारात टीसीएस, एचडीएफसी लाईफ, विप्रो, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एलटीआय माइंडट्रीच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज अदानी समूहाच्या 10 शेअर्सपैकी 9 कंपन्यांचे शेअर्स वधारत होते, फक्त ACC लिमिटेडचे ​​शेअर्स किंचित घसरणीसह व्यवहार करत होते.

S&P BSE SENSEX

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या आठवड्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा देशांतर्गत शेअर बाजाराच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. यामध्ये डॉलर इंडेक्स आणि यूएस बाँड यिल्ड प्रमुख आहेत.

पेटीएममध्ये 5 टक्के अप्पर सर्किट

पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स सोमवारी 5% च्या वाढीसह अप्पर सर्किटवर आले. शेअरने इंट्राडेमध्ये 5% झेप घेतली आणि 358.35 रुपयांची पातळी गाठली. बर्नस्टाईन आणि सिटी या ब्रोकरेज कंपन्यांच्या सकारात्मक अंदाजानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT