Share Market eSakal
Share Market

Share Market : शेअर बाजारात आणखी एक विक्रम! उघडताच ६५,५०० च्या वर पोहोचलं सेन्सेक्स; निफ्टीचीही मुसंडी

बँक निफ्टीमध्येही आज भरपूर उसळी दिसून आली.

Sudesh

भारतीय शेअर मार्केटने एक मोठा रेकॉर्ड केला आहे. मंगळवारी शेअर मार्केट उघडताच सेनेक्सने ऐतिहासिक टप्पा ओलांडला. सुरूवातीलाच सेन्सेक्स ६५,५०० च्या वर पोहोचलं होतं, तर निफ्टी देखील १९,४०० अंकांवर पोहोचलं होतं. बँक निफ्टीमध्येही आज भरपूर उसळी दिसून आली. (Share Market Opening Bell)

आज सकाळी मार्केट उघडताच, सेन्सेक्स २९८.८० अंकांनी उसळून ६५,५०३.८५ अंकांवर पोहोचलं होतं. तर, निफ्टी ८४.०५ अंकांनी उसळून १९,४०६.६० अंकांवर पोहोचलं होतं. सेन्सेक्सचे ३० पैकी २१ शेअर्स सध्या तेजीत आहेत. तर निफ्टीचे ५० पैकी ३३ शेअर्स तेजीत आहेत. (Sensex new record)

या शेअर्समध्ये तेजी

आज बाजार उघडताना बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. बजाज फायनान्सचे शेअर सुमारे ८ टक्क्यांनी वर गेले होते. तर, बजाज फिनसर्व देखील ५.२४ टक्क्यांनी वर गेला आहे. विप्रोच्या शेअर्समध्ये १.२० टक्के वाढ दिसत आहे. तर, टीसीएसमध्ये १.१५ टक्क्यांनी वाढ दिसून आली. टायटन आणि एल अँड टी कंपन्यांचे शेअर्सही १ टक्क्यांनी तेजीत आहेत.

बँकेच्या शेअर्समध्ये वाढ

बँकेच्या शेअर्समध्येही आज चांगली वाढ दिसत आहे. बँक निफ्टी सध्या ४५,३०० अंकांच्या जवळपास दिसत आहे. यामध्ये कालच्या तुलनेत सुमारे १५० अंकांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे रिलीज ! केदार शिंदेंच्या मावशीने सुनावले खडेबोल "काही अतिशहाणे.. "

SCROLL FOR NEXT