Top 10 Shares esakal
Share Market

Share Market Opening : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये ?

खराब मान्सून, डॉलरचे वाढते प्रमाण, हाय बाँड यील्ड आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यांसारख्या नकारात्मक बाबी असूनही बाजारातील वाढ आश्चर्यकारक आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

Share Market Opening : शुक्रवारी बाजारात चांगली वाढ दिसून आली. खराब मान्सून, डॉलरचे वाढते प्रमाण, हाय बाँड यील्ड आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यांसारख्या नकारात्मक बाबी असूनही बाजारातील वाढ आश्चर्यकारक आहे. गेल्या आठवड्यात निफ्टी 1.97 टक्क्यांनी अर्थात 384.7 अंकांनी वाढून 19820 वर बंद झाला, तर बीएसई सेन्सेक्स 1.85 टक्क्यांनी वाढून अर्थात 1,211.75. पॉइंट वाढून 66,598.91 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीचा आवर्ली चार्ट दाखवत आहे की तो रायझिंग चॅनलचच्या वरच्या टोकाला पोहोचल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. अशा स्थितीत पुढील आठवडाभरात तेजी येण्याची शक्यता आहे. हे कंसोलिडेशन 19850 - 19670 च्या रेंजमध्ये येऊ शकते. या परिस्थितीत आपण कोणत्याही घसरणीवर खरेदीच्या संधी शोधल्या पाहिजेत. पुढील आठवड्यात आपण निफ्टी वरच्या बाजूने 19900 जाताना दिसू शकतो. डाउनसाइडवर 19630 - 19670 वर सपोर्ट दिसत आहे आणि वरच्या बाजूस, 19860 - 19900 वर रझिस्टंस दिसत आहे.

बँक निफ्टीमध्येही खरेदी परतली आहे. मोमेंटम इंडिकेटरमध्ये सकारात्मक क्रॉसओव्हर आहे जे तेजीचे संकेत आहेत. एकूणच, बँक निफ्टीतील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. शॉर्ट टर्ममध्ये बँक निफ्टीमध्ये 45500 ची पातळी दिसू शकते. (Share Market)

आजचे टॉप 10 अ‍ॅक्शन शेअर्स कोणते ?

एनटीपीसी (NTPC)

कोल इंडिया (COALINDIA)

बीपीसीएल (BPCL)

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

एल अँड टी (LT)

श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

बंधन बँक (BANDHANBNK)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine Ceasefire : रशिया-युक्रेन युद्धबंदीच्या ठरावादरम्यान भारत अनुपस्थित, अमेरिकेनीही घेतला नाही सहभाग; झेलेन्स्कींना झटका !

Mumbai Railway : T20 वर्ल्ड कप बघायला आलेल्या विदेशी पर्यटकांच्या रील्समधून मुंबईतील रेल्वेंची 'थू-थू'; कचरा, अतिक्रमणाचे व्हिडिओ व्हायरल; हे स्टेशन की कचराकुंडी?

T20 World Cup: पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाची देहबोली बदलली; सरावातही लक्षणीय बदल

Holi 2026: बरसाना विसरा! 'या' गावात महिला मारतात लाठ्या आणि पुरुष नाचतात साडी नेसून; लट्ठमार होळीचे हे ठिकाण माहीत आहे का?

Ration card verification : सर्वेक्षणातून होणार रेशन ग्राहकांची खातरजमा; घरोघरी जाऊन घेतली जाणार माहिती, केंद्र सरकारकडून खासगी कंपनी नियुक्ती

SCROLL FOR NEXT