Share Market Opening latest updates in marathi Sensex down 600, Nifty around 21k 21 december 2023  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी विक्री; सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला

Share Market Opening: आशियाई आणि अमेरिकन शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून येत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 21 December 2023: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी प्रॉफिट बुकींग पाहायला मिळू शकते. कारण जागतिक संकेत नकारात्मक आहेत. GIFT निफ्टी 21,100 च्या पातळीवर घसरला आहे. आशियाई आणि अमेरिकन शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून येत आहे. सुमारे 300 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 70,200च्या पातळीवर आहे. निफ्टीही 100 अंकांनी घसरून 21,000 च्या पातळीवर गेला आहे.

आज निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात घसरण झाली. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, ओएनजीसी आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स किंचित वाढीसह व्यवहार करत होते तर टाटा कंझ्युमर आणि ब्रिटानियाचे शेअर्स घसरले होते.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये जिओ फायनान्शियल आणि स्टोव्ह क्राफ्टचे शेअर्स वधारत होते तर पटेल इंजिनिअरिंग, कामधेनू लिमिटेड, एक्साइड इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, युनिपार्ट्स इंडिया, देवयानी इंटरनॅशनल आणि ओम इन्फ्रा यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

अमेरिकन बाजार घसरले

बुधवारी अमेरिकन बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी 1.27 टक्क्यांनी घसरला आणि 37,100 अंकांच्या खाली आला. S&P 500 मध्ये 1.47 टक्क्यांची घसरण झाली.

दोन महिन्यांत या निर्देशांकामध्ये सर्वात जास्त घसरण झाली. टेक-केंद्रित नॅस्डॅक 1.5 टक्क्यांनी घसरला. आज अमेरिकेत जीडीपी आणि महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे.

आशियाई बाजारात घसरण

गुरुवारी आशियाई बाजारही घसरले आहेत. जपानचा निक्केई 1.31 टक्के, तर टॉपिक्स 1.18 टक्क्यांनी खाली आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.36 टक्के आणि कोस्डॅक 0.20 टक्क्यांनी खाली आहे. ऑस्ट्रेलियाचा S&P ASX 200 0.57 टक्क्यांनी घसरला आहे. हाँगकाँगच्या हँग सेंग फ्युचर्सची सुरुवात घसरणीने होण्याची चिन्हे दिसत आहेत.

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ते अजूनही शेअर बाजारातबाबात सकारात्मक आहेत आणि प्रॉफिट बुकींगनंतर शेअर बाजारात रिकव्हरी होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, जिल्ह्यातील ४१ मार्गांवर पाणी; राधानगरी धरणाचे ५ दरवाजे बंद, असा आहे पावसाचा अंदाज?

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नाशिकमध्ये पूरस्थितीची शक्यता

SCROLL FOR NEXT