Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात नवीन विक्रम, सेन्सेक्सने प्रथमच केला 71,800 टप्पा पार

Share Market Opening: चांगल्या जागतिक संकेतांमुळे बुधवारी शेअर बाजारात नवा विक्रम झाला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 20 December 2023:

चांगल्या जागतिक संकेतांमुळे बुधवारी शेअर बाजारात नवा विक्रम झाला. प्रमुख निर्देशांकांनी नवीन सर्वकालीन उच्चांक गाठले. पहिल्यांदाच सेन्सेक्सने 71850 आणि निफ्टीने 21550 चा टप्पा पार केला.

बाजारपेठेत एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रात सर्वाधिक खरेदी नोंदवली जात आहे. टेक महिंद्रा आणि विप्रो हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढलेले आहेत, तर M&M आणि मारुतीचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत.

सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक वाढ नोंदवत होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात वाढ दर्शविणाऱ्या शेअर्समध्ये एलटीआय माइंडट्री, टेक महिंद्रा, विप्रो आणि टीसीएस सारख्या कंपन्यांचे शेअर्स वधारत होते तर पिरामल एंटरप्रायझेस, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, राजेश एक्सपोर्ट आणि मिंडा कॉर्पोरेशनचे शेअर्स घसरले.

मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये ओम इन्फ्रा, ब्रँड कॉन्सेप्ट, देवयानी इंटरनॅशनल, युनि पार्ट्स इंडिया, पटेल इंजिनीअरिंग, जिओ फायनान्शिअल, कामधेनू लिमिटेड, टाटा मोटर्स, स्टोव्ह क्राफ्ट आणि एक्साइड इंडस्ट्रीज यांचे शेअर्स वधारले.

अदानी समूहाच्या नऊ सूचीबद्ध कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवली तर अदानी पॉवर लिमिटेडचे ​​शेअर्स किंचित घसरणीसह व्यवहार करत होते.

बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात हजूर मल्टी प्रोजेक्ट्स, बीसीएल इंडस्ट्रीज, डीपी वायर्स, कजारिया सिरॅमिक्स, साउथ इंडियन बँक, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, गेल इंडिया, बंधन बँक, आयटीसी लिमिटेड, इंडियन ऑइल, पंजाब नॅशनल बँक, चेंबंड केमिकल आणि वोक्हार्ट लिमिटेडच्या ​​शेअर्समध्ये तेजी होती.

जागतिक संकेत चांगले

आज देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक संकेत चांगले दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये खरेदी दिसून येत आहे. याआधी मंगळवारी अमेरिकन बाजारही वाढीने बंद झाले होते. मंगळवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 252 अंकांनी वाढून 37557.92 च्या पातळीवर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

टॉपची कलाकार आणि कोट्यवधींची कमाई असूनही भाड्याच्या घरात राहते ही अभिनेत्री ; महिन्याचं भाडं वाचून बसेल धक्का !

Protein Benefits: फक्त बॉडीसाठी नव्हे, तर दैनंदिन आरोग्य टिकवण्यासाठीही प्रोटीन अत्यंत गरजेचं! जाणून घ्या कारणे

Horscope : उद्यापासून धनदौलत योग! 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू; नोकरी-व्यवसायात मोठी संधी, अडकलेल्या कामात मिळेल नशिबाची साथ

फी न भरल्याने आठवीतील विद्यार्थ्याला परीक्षेस मज्जाव, शाळेच्या कारवाईविरोधात कडक पाऊल उचलण्याचा इशारा, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT