Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरूवात; सेन्सेक्स 70,800 अंकावर, कोणत्या क्षेत्रात वाढ?

Share Market Opening: शुक्रवारी शेअर बाजार सपाट उघडला. मिश्र जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक स्थिर आहेत. सेन्सेक्स 70,900 आणि निफ्टी 21250 च्या वर व्यवहार करत आहे. मेटल क्षेत्रात सर्वाधिक खरेदी होत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 22 December 2023: शुक्रवारी शेअर बाजार सपाट उघडला. मिश्र जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक स्थिर आहेत. सेन्सेक्स 70,900 आणि निफ्टी 21250 च्या वर व्यवहार करत आहे.

मेटल क्षेत्रात सर्वाधिक खरेदी होत आहे. याशिवाय आयटी आणि फार्मामध्येही खरेदी होताना दिसत आहे. अदानी पोर्ट्स, LTIMINDTREE आणि Hindalco हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत. तर ICICI बँक सर्वाधिक घसरला आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटीमध्ये किंचित वाढ झाली आहे, तर निफ्टी बँक थोड्या घसरणीसह व्यवहार करत होता.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात वाढ झालेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एचसीएल टेक, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली होती, तर एअरटेल, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि टायटन या शेअर्समध्ये घसरण झाली.

यासोबतच एसबीआय, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस लिमिटेड यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

अमेरिकन बाजार सावरला

घसरणीनंतर जागतिक बाजार पुन्हा तेजीत आले आहेत. चांगल्या आर्थिक आकडेवारीनंतर गुरुवारी अमेरिकन बाजारात तेजी दिसून आली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी 0.87 टक्क्यांनी वाढला आणि 37,400 अंकावर पोहचला.

S&P 500 ने 1 टक्क्यांहून अधिक वाढ केली. चांगल्या जीडीपी डेटामुळे आशा वाढली आहे की यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदर कमी करण्यास सुरुवात करेल.

आशियाई बाजारात पुन्हा तेजी

आज, शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आशियाई बाजारांमध्येही तेजीचे वातावरण आहे. जपानचा निक्केई 0.36 टक्क्यांनी वर आहे, तर टॉपिक्स 0.51 टक्क्यांनी वर आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.43 टक्के आणि कोस्डॅक o.33 टक्के तेजीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: नोकरीमध्ये मराठी माणसाला स्थान नाही : संजय राऊत

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

SCROLL FOR NEXT