Share Market  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार नव्या विक्रमी उच्चांकावर उघडला; निफ्टीने प्रथमच 20,120 चा टप्पा ओलांडला

Share Market Opening: प्रमुख बाजार निर्देशांक नवीन विक्रमी उच्चांकावर उघडले.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 14 September 2023: शेअर बाजारात गुरुवारी नवा विक्रम झाला. प्रमुख बाजार निर्देशांक नवीन विक्रमी उच्चांकावर उघडले. NSE निफ्टी प्रथमच 20,127 वर उघडला. त्याचप्रमाणे BSE सेन्सेक्सनेही 67,693 चा टप्पा गाठला. मेटल शेअर्स बाजाराच्या वाढीमध्ये आघाडीवर आहेत. यामध्ये टाटा स्टीलचा शेअर 2% वाढीसह टॉप गेनर आहे. तर एफएमसीजी क्षेत्रात विक्री होत आहे.

Share Market Opening 14 September 2023 (S&P BSE SENSEX)

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

बीएसई सेन्सेक्समध्ये आज टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक वाढीसह व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, एसबीआय, पॉवरग्रीड, एशियन पेंट्स, टीसीएस, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स आणि बजाज फायनान्स तेजीसह व्यापार करत होते.

याशिवाय नेस्ले इंडिया, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, आटीसी या कंपन्यांचे शेअर्स सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

NSE IX वर, गिफ्ट निफ्टी 36 अंकांच्या किंवा 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 20,182 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची गुरुवारी सकारात्मक सुरुवात होऊ शकते, असे संकेत मिळत होते. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्समध्ये 70 अंकांची वाढ दिसून आली. त्याचवेळी निफ्टी 20,100 अंकांच्या वर व्यवहार करत होता.

अमेरिकेतील महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून आली. याचे कारण अमेरिकेतील महागाई दराची आकडेवारी बाजारासाठी आश्चर्यचकित करणारी आहे कारण महागाई दरात थोडीशी वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT