Share Market update Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार पुन्हा विक्रमी पातळीवर उघडला; सेन्सेक्स-निफ्टी नवीन शिखरावर, कोणते शेअर्स चमकले?

Share Market Opening: बाजारातील तेजीचा आज 11 वा दिवस आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 15 September 2023: शुक्रवारी शेअर बाजारात नवा विक्रम झाला. बाजारातील प्रमुख निर्देशांक विक्रमी पातळीवर उघडले. प्रथमच, BSE सेन्सेक्स 67,659 वर आणि NSE निफ्टी 20,156 वर उघडला. बाजारातील तेजीचा आज 11 वा दिवस आहे.

शेअर बाजारातील जोरदार वाढीमध्ये मेटल, ऑटो आणि आयटी शेअर्स आघाडीवर आहेत. बजाज ऑटो, विप्रो आणि हिंदाल्को यांचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत, तर एशियन पेंट्सचे शेअर्स सुमारे 1 टक्क्यांनी घसरले आहेत. याआधी गुरुवारी भारतीय बाजारात तेजीची नोंद झाली.

Share Market Opening 15 September 2023 (S&P BSE SENSEX)

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

टाटा मोटर्सचे शेअर्स आज बीएसई सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढीसह व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे विप्रो, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, अचीलटेक, इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा आणि लार्सन अँड टुब्रो यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.

निफ्टीवर 'या' शेअर्समध्ये घसरण

NSE निफ्टीवर, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल, टायटन, इंडसइंड बँक, आयटीसी आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

NSE IX वर, गिफ्ट निफ्टी 12 अंकांच्या किंवा 0.06 टक्क्यांच्या वाढीसह 20,229.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यामुळे शुक्रवारी दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT