Share Market Closing latest updates today bse nse sensex nifty  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 16,600 च्या खाली, सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला

Share Market Opening: सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 3 October 2023: जागतिक बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारांची मंगळवारी (3 ऑक्टोबर) घसरणीसह सुरुवात झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले. मेटल शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

सेन्सेक्स 65,813.42 वर घसरून उघडला. तर निफ्टीमध्ये व्यवहाराची सुरुवात 19,622.40 अंकांवर झाली. अल्पावधीतच बाजारातील घसरण वाढली. सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांनी घसरला. तर निफ्टीही 19,600 च्या खाली घसरला.

Share Market Opening 3 October 2023 (S&P BSE SENSEX)

सेन्सेक्स निफ्टीवर 'या' शेअर्समध्ये तेजी

निफ्टीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स तेजीत होते. मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात घसरण झालेल्या शेअर्समध्ये ओएनजीसी, आयशर मोटर्स, हिंदाल्को, मारुती आणि एसबीआय लाइफ या शेअर्सचा समावेश होता.

मंगळवारी सकाळी बीएससीचे जवळपास सर्वच निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. मुंबई शेअर बाजारातही आयशर मोटर्स, एस्टेक, ओएनजीसी आणि ऑइल इंडियाच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात होती, तर मॅरिको, सफारी इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होत होती.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ओम इन्फ्रा, जिओ फायनान्शिअल, स्टोव्ह क्राफ्ट, कामधेनू लिमिटेडच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये सहा कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर अदानी एंटरप्रायझेस, अदानी विल्मार आणि अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये किंचित घसरण झाली.

जागतिक बाजारात काय परिस्थिती?

जागतिक बाजारातून कमकुवत संकेत आहेत. आशियाई बाजारात 1 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून येत आहे. काल अमेरिकन बाजारात संमिश्र व्यवहार दिसून आला. डॉलर आणि रोखे उत्पन्न वाढल्याने बाजारावर दबाव होता. डॉलर निर्देशांक 107.06 च्या पातळीवर पोहोचला आहे. ऑगस्टपासून S&P 500 निर्देशांक 13 टक्क्यांनी घसरला आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती

कच्च्या तेलाच्या किंमती सलग तिसऱ्या आठवड्यात दबावाखाली आहेत. ब्रेंटची किंमत 91-डॉलरच्या खाली घसरली आहे. WTI देखील 89 डॉलरच्या खाली व्यापार करत आहे. 3 आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमती 4.50 टक्क्यांनी घसरल्या आहेत. बाजारात 1.20 लाख बीडीपीचा पुरवठा वाढला आहे. इराण आणि नायजेरियातून पुरवठा वाढल्याने किंमती घसरल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT