Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Bajaj Auto up percent, Wipro down 3 percent 19 October 2023  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरुच; सेन्सेक्स 400 अंकांनी खाली, कोणते शेअर्स घसरले?

Share Market Opening: सेन्सेक्स 440 अंकांनी घसरून 65,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 19 October 2023: गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. BSE सेन्सेक्स 440 अंकांनी घसरून 65,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीही 120 अंकांनी घसरून 19,500 च्या पातळीवर पोहोचला आहे. निफ्टीमध्ये, बजाज ऑटोच्या निकालांमुळे 4% वाढ झाली, तर विप्रो कंपनीचे शेअर्स 3% घसरले.

कोणत्या शेअर्समध्ये वाढ?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बजाज ऑटो, L&T Mindtree, IndusInd Bank, Divi's Labs या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे, तर विप्रो, Hindalco, Tata Steel आणि JSW स्टीलच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या सर्व नऊ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात आहे. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 928 रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी पोर्ट्स, अदानी विल्मर, एसीसी लिमिटेड, अदानी टोटल गॅस, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्ही या सर्व कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

शेअर बाजारात घसरण का होत आहे?

शेअर बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांची विक्री हे आहे. मध्यपूर्वेतील इस्राइल आणि हमास यांच्या वाढत्या संघर्षामुळे आणि व्याजदर वाढल्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारांना विक्रीच्या दबावाचा सामना करावा लागत आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?

मोतीलाल ओसवाल संशोधन विभागाचे प्रमुख सिद्धार्थ खेमका म्हणाले, "येत्या काळात शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसू शकतो कारण कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने वस्तूंच्या किंमतींवर परिणाम होऊ शकतो. जोपर्यंत इस्रइल आणि गाझा यांच्यातील तणाव कमी होत नाही तोपर्यंत गुंतवणूकदारांचा कल नकारात्मक राहू शकतो "

जागतिक बाजारपेठेत मोठी घसरण

जागतिक बाजारातील शेअर बाजारावर दबाव आहे. बुधवारी अमेरिकन बाजारात घसरण होत आहे. डाऊ जोन्स सरासरी 0.98 टक्क्यांनी घसरला आहे. आजच्या व्यवहारात आशियाई बाजारांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जपानचा निक्केई 1.86 टक्क्यांनी घसरला आहे. हाँगकाँगचा हँग सेंग सुमारे 1.88 टक्के घसरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: बाळापूर नगरपरिषद निवडणूक निकाल, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी यश

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT