Share Market Sakal
Share Market

Share Market Opening: इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा परिणाम, बाजार उघडताच सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला

Share Market Opening: हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 9 October 2023: हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे. आज या हल्ल्यानंतर शेअर बाजार सुरुवातीलाच घसरला. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात घसरले.

सेन्सेक्स 470 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला. सकाळी 9:20 वाजता, सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांनी घसरला होता आणि 65,500 अंकांच्या खाली व्यवहार करत होता, तर निफ्टी सुमारे 170 अंकांनी घसरला होता आणि 19,485 अंकांच्या खाली होता.

कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टायटन आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.

कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात रॅमको सिमेंट, शेफलर इंडिया आणि ओरिएंट इलेक्ट्रिक सारख्या कंपन्यांचे शेअर्स घसरले. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात Jio Financial Services च्या शेअर्समध्ये 5 रुपयांची घसरण झाली. स्टोव्ह क्राफ्ट तीन टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. पटेल इंजिनीअरिंगचे शेअर्स 4 टक्क्यांनी, गति लिमिटेडचे ​​शेअर्स 3.7 टक्क्यांनी घसरले.

Share Market Opening 9 October 2023 (S&P BSE SENSEX)

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अदानी पॉवर लिमिटेडचे ​​शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले. अदानी विल्मारमध्ये तीन टक्क्यांहून अधिक घसरण होती. अदानी पोर्ट्स आणि एनडीटीव्ही तीन टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंटसह अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात आहे.

जागतिक बाजारांची स्थिती

जागतिक बाजारात संमिश्र कल आहे. शुक्रवारी अमेरिकन बाजार नफ्यात होते. डाऊ जोन्स सरासरी 0.87 टक्क्यांनी वाढला. NASDAQ कंपोझिट इंडेक्समध्ये 1.60 टक्के आणि S&P 500 मध्ये 1.18 टक्के तेजी होती. शुक्रवारी अमेरिकन बाजार बंद झाल्यानंतर इस्रायलवर हमासचा हल्ला झाला, त्यामुळे अमेरिकन बाजारात काय होणार हे आज कळेल.

आजच्या व्यवहारात आशियाई बाजारात संमिश्र कल आहे. जपानचा निक्केई 0.26 टक्क्यांनी घसरला आहे. हाँगकाँगच्या हँग सेंगमध्ये वादळाचा इशारा दिल्यानंतर बाजार मध्येच बंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT