Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Britannia gains, Tata Steel falls 2 November 2023  Sakal
Share Market

Share Market Opening: 2 दिवसांनी शेअर बाजारात खरेदी; सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Opening: सलग 2 दिवसांच्या विक्रीनंतर गुरुवारी शेअर बाजारात खरेदीची नोंद होत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 2 November 2023:

सलग 2 दिवसांच्या विक्रीनंतर गुरुवारी शेअर बाजारात खरेदीची नोंद होत आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला आणि 64,100 चा टप्पा पार केला. निफ्टीही 150 अंकांनी वाढून 19,140 च्या जवळ व्यवहार करत आहे. बाजारात खरेदी होत असून, सर्वाधिक खरेदी आयटी, पीएसयू बँका आणि रिअॅल्टी शेअर्समध्ये होत आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात सन फार्मा, बीपीसीएल, हिंदाल्को आणि बजाज ऑटो या शेअर्समध्ये तेजी होती, तर एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली. शेअर बाजाराच्या निर्देशांकांमध्ये निफ्टी मिडकॅप, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक या सर्वांमध्ये सुमारे एक टक्का वाढ झाली.

कोणते शेअर्स वाढले?

गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ओम इन्फ्रा, पटेल इंजिनीअरिंग, अंबुजा सिमेंट, बजाज फायनान्स आणि कामधेनू लिमिटेडच्या शेअर्सनी चांगला नफा नोंदवला. स्टोव्ह क्राफ्ट, जिओ फायनान्शियल, युनि पार्ट्स, देवयानी इंटरनॅशनल आणि गती लिमिटेडचे ​​शेअर्सही गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात वाढले. अदानी समूहाचे 9 शेअर्सपैकी 8 शेअर्स वाढले.

शेअर बाजारातील तज्ज्ञ काय म्हणतात?

गुरुवारी जगभरातील शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. बाजारातील गुंतवणूकदारांना आशेचा किरण दाखवला आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेची मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्ह 'प्रतीक्षा करा आणि पहा' या धोरणावर काम करत आहे. त्यामुळे भारतातील शेअर बाजाराचे कामकाज तेजीसह सुरू झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT