Share Market Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला, बँकिंग-आयटी शेअर्समध्ये...

Share Market Opening: शेअर बाजार का घसरतोय?

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 21 September 2023:

कमकुवत जागतिक आणि देशांतर्गत संकेतांमुळे शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. BSE सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला आणि 66,500 च्या पातळीवर आला. निफ्टीही 80 अंकांनी घसरून 19,800 च्या पातळीवर आला आहे.

'या' शेअर्सवर दबाव

बाजारातील विक्रीत सर्वात मोठी घसरण खाजगी बँकिंग, वित्तीय आणि आयटी क्षेत्रात झाली आहे. निफ्टीमध्ये एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स प्रत्येकी 1% पेक्षा जास्त घसरले आहेत. तर डॉ.रेड्डीचे शेअर्स दीड टक्क्यांनी वाढले आहेत.

Share Market Opening 21 September 2023 (S&P BSE SENSEX)

शेअर बाजार का घसरतोय?

  • जागतिक बाजारात चौफेर विक्री

  • US FED ने पुढील दर वाढीचे संकेत दिले आहेत

  • डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत आहे

  • हेवीवेट शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

बीएसई सेन्सवर एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फिनसर्व्ह, लार्सन अँड टुब्रो, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी, टाटा स्टील, इंडसइंड बँक, टायटन, पॉवरग्रिड आणि हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे शेअर्स घसरले आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एसबीआय, सन फार्मा, अॅक्सिस बँक आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. NSE IX वर, गिफ्ट निफ्टी 48 अंकांच्या किंवा 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह 19,857.50 अंकांवर व्यवहार करत होता. यामुळे गुरुवारी दलाल स्ट्रीटची सुरुवात नकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT