Share Market opening latest updates marathi Sensex, Nifty today Tata Consumer, TechM, HDFC Bank among top blue-chip losers 9 November 2023  Sakal
Share Market

Share Market Opening: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 64,900च्या जवळ, कोणत्या शेअर्सचे नुकसान?

Share Market Opening: बाजारातील प्रमुख निर्देशांक किंचीत घसरणीसह व्यवहार करत आहेत.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 9 November 2023:

शेअर बाजार गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सपाट उघडला. बाजारातील प्रमुख निर्देशांक किंचीत घसरणीसह व्यवहार करत आहेत. BSE सेन्सेक्स 64,900 आणि निफ्टी 19,400 च्या जवळ व्यवहार करत आहे. एफएमसीजी, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातून बाजारावर दबाव येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, निफ्टीमध्ये किंचित वाढ झाली असून दिवाळीच्या आसपास तो 19,500 पार करण्याचा प्रयत्न करू शकतो. परकीय गुंतवणूकदारांची झपाट्याने विक्री होत असूनही निफ्टीवर तितकासा परिणाम झाला नाही.

WTE क्रूड ऑइल फ्युचर्सच्या किंमती प्रति बॅरल 75 डॉलर आहे जी तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे सौदी अरेबिया आणि रशियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केल्यानंतरही त्याच्या किंमतीत सुधारणा होत नाही.

निफ्टीचे लक्ष्य 19,500 आणि नंतर 19,789 आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले असून येत्या काळात अमेरिकेत व्याजदर वाढणार नाहीत, असा विश्वास शेअर बाजारातील व्यापारी आणि गुंतवणूकदारांना आहे.

गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात आशियाई शेअर बाजार तेजीत होते आणि डॉलरमध्ये घसरण झाली होती. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅपमध्ये किंचित वाढ नोंदवली जात होती, तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बीपीसीएल, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर सिप्ला, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या नऊ पैकी 6 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली जात होती. अदानी एंटरप्रायझेस, अंबुजा सिमेंट आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली. अदानी समूहाच्या इतर सर्व कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

मल्टीबॅगर शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर ओम इन्फ्रा, महिंद्रा अँड महिंद्रा, स्टोव्ह क्राफ्ट, जिओ फायनान्शिअल, पटेल इंजिनीअरिंग, एक्साइड इंडस्ट्रीज, गती लिमिटेड, टाटा मोटर्स, युनिपार्ट्स इंडियाचे शेअर्स वधारत होते तर कामधेनू लिमिटेड आणि देवयानी इंटरनॅशनलचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT