Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Opening: बाजारात ऐतिहासिक तेजी, निफ्टी 18,908 च्या विक्रमी पातळीवर उघडला, सेन्सेक्सही 63700 च्या वर

अखेर शेअर बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे.

राहुल शेळके

Share Market Opening 28 June 2023: अखेर शेअर बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. शेअर बाजाराची सुरुवात प्रचंड तेजीसह झाली आहे. 1 डिसेंबर 2022 नंतर, निफ्टी नवीन उच्चांकावर उघडला. सेन्सेक्सने 63700 च्या पुढे व्यवहार करत आहे आणि तो विक्रमी उच्चांकावर उघडण्यात यशस्वी झाला आहे.

BSE सेन्सेक्स 1.16 टक्क्यांच्या वाढीसह 63,701.78 च्या पातळीवर उघडला. त्याच वेळी, निफ्टी 18,908.15 च्या उच्चांकावर उघडला आहे. निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांकासह व्यवसायाची सुरुवात केल्याने गुंतवणूकदारांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत.

शेअर बाजाराच्या तेजीतील विशेष गोष्ट

142 सत्रांनंतर, निफ्टीने हा नवीन सार्वकालिक उच्चांक बनवला आहे आणि ही पातळी ओपनिंगच्या वेळीच गाठली गेली.

दुसरीकडे, सेन्सेक्सने आज पुन्हा 63716 हा सार्वकालिक उच्चांक गाठला आहे, जो काही दिवसांपूर्वी नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. बँक निफ्टीनेही आज नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे.

Share Market Opening 28 June 2023

BSE सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या 30 शेअर्सपैकी 24 शेअर्स वेगाने व्यवहार करत आहेत. एसबीआयचा शेअर सर्वाधिक वाढणारा आहे. तर पॉवर ग्रिडच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात एसबीआयच्या शेअरने सर्वात मोठी उसळी घेतली. त्याचप्रमाणे टाटा मोटर्स, टाटा स्टील, बजाज फायनान्स, टायटन, एचडीएफसी, इन्फोसिस, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, आयटीसी आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सुरुवातीच्या व्यवहारात एनटीपीसी, पॉवरग्रीड, कोटक महिंद्रा बँक आणि अॅक्सिस बँक यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 52 अंकांच्या किंवा 0.28 टक्क्यांच्या वाढीसह 18,863 अंकांवर व्यवहार करत होता. यावरून बुधवारी दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळाले.

प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्सने 250 हून अधिक अंकांची उसळी घेतली. त्याचवेळी निफ्टीने 18,900 चा टप्पा ओलांडला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उच्च बाजारमूल्यांकन हा आगामी काही काळासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. गुंतवणूकदार विक्रमी उच्च पातळीवर काही नफा बुक करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT