Share Market Latest Updates Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार नव्या विक्रमी उच्चांकावर उघडला; निफ्टी प्रथमच 19,600 पार, 'या' शेअर्समध्ये तेजी

आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे.

राहुल शेळके

Share Market Opening 17 July 2023: आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. व्यवहाराची सुरुवात विक्रमी उच्चांकासह झाली आहे. NSE चा निफ्टी 19,612 च्या नवीन ऐतिहासिक उच्चांकावर उघडला.

आजच्या व्यवहाराची सुरुवात जोरदार वाढीसह झाली आणि NSE निफ्टी 47.65 अंकांच्या किंवा 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 19,612.15 च्या विक्रमी पातळीवर उघडला. BSE चा सेन्सेक्स देखील 87.28 अंकांच्या म्हणजेच 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 66,148.18 वर उघडला आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 23 शेअर्स तेजीसह तर 7 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय NSE निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 38 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे आणि 12 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

बीएसई सेन्सेक्सवर, पॉवरग्रिडचा शेअर सर्वाधिक 0.69 टक्क्यांनी वाढला. त्याचप्रमाणे एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, बजाज फायनान्स, सन फार्मा, टाटा स्टील, विप्रो, मारुती, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो आणि एचयूएल हे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

इन्फोसिस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्स घसरले.

या कंपन्यांचे तिमाही निकाल आज येणार

HDFC बँक, LTI Mindtree, Tata LXI सारख्या कंपन्या आज तिमाही निकाल जाहीर करतील. कंपन्यांच्या कमाईच्या आकडेवारीवर गुंतवणूकदारांची नजर असते. यावरून बाजाराची दिशा ठरते.

आशियाई शेअर बाजारांची कमकुवत सुरुवात

चीनची आर्थिक आकडेवारी समोर आल्यानंतर सोमवारी आशियाई शेअर बाजारांची सुरुवात कमजोर झाली. मात्र, कमाईचा हंगाम सुरू झाल्याने आगामी काळात बाजारात तेजी येण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT