Share Market Sakal
Share Market

Share Market Opening: दोन दिवसानंतर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स पुन्हा 65,000 पार, कोणत्या शेअर्समध्ये वाढ?

Share Market Opening: निफ्टी 19,300 च्या वर व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 28 August 2023: व्यापार सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी आहे. चांगल्या जागतिक संकेतांमुळे बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह उघडले. BSE सेन्सेक्स 65,000 च्या वर गेला आहे. निफ्टी देखील 19,300 च्या वर व्यवहार करत आहे. बाजारातील तेजीमुळे मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी होत आहे.

निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 3 टक्क्यांनी वाढला आहे. तर बजाज फायनान्सचा शेअर सर्वाधिक घसरला आहे.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढीसह तर 15 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. याचा अर्थ घसरणाऱ्या आणि वाढणाऱ्या शेअर्सची संख्या समान आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 27 शेअर्स वाढीसह तर 23 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

क्षेत्रीय निर्देशांकात आज, FMCG आणि IT क्षेत्र वगळता, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. FMCG 0.33 टक्के आणि IT 0.28 टक्क्यांनी घसरला आहे. वाढत्या क्षेत्रांपैकी, रिअल्टी क्षेत्र 0.98 टक्क्यांनी वर आहे आणि मीडिया शेअर्समध्ये 0.66 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

लार्सन अँड टुब्रोचा शेअर सुरुवातीच्या व्यवहारात सर्वाधिक वाढीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, पॉवरग्रीड, मारुती, विप्रो, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, टायटन, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक सेन्सेक्सवर घसरणीसह व्यवहार करत होते.

NSE IX वर, GIFT निफ्टी आज 45 अंकांच्या म्हणजेच 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 19,282.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळाले. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 20 अंकांची वाढ दिसून आली. त्याच वेळी निफ्टी 19,295 अंकांच्या वर व्यवहार करत होता.

आशियाई शेअर बाजारात तेजी

सोमवारी आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून आली. याचे कारण म्हणजे चीनने आपली कमकुवत अर्थव्यवस्था हाताळण्यासाठी काही नवीन पावले उचलली आहेत. यूएस जॉब डेटा आणि महागाईशी संबंधित डेटामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT