share market  sakal
Share Market

Share Market Opening : चांगल्या जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

आशियाई देशांचे शेअर बाजार वेगाने व्यवहार करत आहेत

सकाळ डिजिटल टीम

Share Market Opening : जगभरातील शेअर बाजारातील वाढीमुळे, भारतीय शेअर बाजार गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात तेजीसह उघडला. आशियाई देशांचे शेअर बाजार वेगाने व्यवहार करत आहेत, त्यामुळे भारतीय बाजारही तेजीत आहे.

BSE सेन्सेक्स 291 अंकांच्या उसळीसह 61,566 वर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 79 अंकांच्या उसळीसह 18,094 वर उघडला. बाजारातील वेग आणखी वाढला आहे आणि सेन्सेक्स 386 आणि निफ्टी आता 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.

आज भारतीय शेअर बाजारात सर्वच क्षेत्रातील शेअर्स वेगाने व्यवहार करत आहेत. बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, फार्मा, मीडिया, ऑइल अँड गॅस, एनर्जी, इन्फ्रा, एफएमसीजीचे क्रेडिट कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स वधारत आहेत.

BSE India

निफ्टी बँक 200 अंकांच्या वाढीसह 41,920 अंकांवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्समधील सर्व 30 समभाग तेजीसह व्यवहार करत आहेत. तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 46 समभाग तेजीसह तर केवळ 4 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आजच्या व्यवहारात टेक महिंद्रा 2.68 टक्के, रिलायन्स 1.18 टक्के, सन फार्मा 1.05 टक्के, कोटक महिंद्रा 0.83 टक्के, एचडीएफसी 0.76 टक्के, एशियन पेंट्स 0.74 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.73 टक्के, टीसीएस 0.67 टक्के, एसबीआय 0.63 टक्के, एचडीएफसी बँक 0.63 टक्के शेअर्स तेजीत व्यवसाय करत आहेत.

ग्रासिम 0.32 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.27 टक्के, हिरो मोटोकॉर्प 0.25 टक्के, बीपीसीएल 0.23 टक्के, एसबीआय लाइफ इन्शुरन्स 0.13 टक्के, इंडिगो 4.14 टक्के, व्होडाफोन आयडिया 1.94 टक्के, चंबळ फर्टिलायझर 1.65 टक्के हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

जागतिक बाजार :

अमेरिकेत डाऊ जोन्स 39 अंकांनी तर नॅस्डॅक 110 अंकांनी वधारून बंद झाला. त्यानंतर आशियाई बाजारात निक्की 0.73 टक्के, स्ट्रेट टाइम्स 1.23 टक्के, हँगसेंग 2.08 टक्के, तैवान 0.89 टक्के, कोस्पी 1.85 टक्के, शांघाय 0.77 टक्के वाढीसह व्यवहार करत आहे. फक्त जकार्ताच्या बाजारपेठेत घसरण सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT