Share Market update
Share Market update Sakal
Share Market

Share Market Opening: दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ, 'या' शेअर्समध्ये...

राहुल शेळके

Share Market Opening 18 May 2023: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार तेजीसह उघडला. BSE सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांच्या वाढीसह 61800 च्या वर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे निफ्टीनेही 80 हून अधिक अंकांच्या वाढीसह 18,250 चा टप्पा पार केला आहे. बाजारात सरकारी बँकिंग आणि मेटलचे शेअर्समध्ये मोठी वाढ होत आहे.

NSE वर निफ्टी मेटल इंडेक्स 1 टक्क्यांनी वाढला आहे. JSW स्टीलचा शेअर निफ्टीमध्ये 1.25 टक्क्यांच्या वाढीसह प्रथम स्थानी आहे.

तर डिव्हिस लॅबचा शेअर सर्वाधिक घसरला आहे. बाजारात फार्मा शेअर्समध्ये विक्री दिसून येत आहे. बुधवारी बीएसई सेन्सेक्स 371 अंकांनी घसरून 61,560 वर आणि निफ्टी 104 अंकांनी घसरून 18,181 वर बंद झाला.

Share Market Opening 18 May 2023

आजच्या व्यवहारात बँक निफ्टीमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. बँक निफ्टी 0.80 टक्क्यांनी किंवा 349 अंकांच्या वाढीसह 44000 च्या वर व्यवहार करत आहे.

आयटी, ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्सही तेजीत आहेत. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही तेजी आहे.

जागतिक बाजारातून चांगले संकेत:

आशियाई बाजार तेजीसह व्यवहार करत आहेत. प्रत्यक्षात बुधवारी अमेरिकन शेअर बाजार तेजीसह बंद झाला होता. त्यामुळे भारतासह आशियाई बाजारात तेजी आहे.

डाऊ जोन्स 408, नॅस्डॅक 157 आणि S&P 49 अंकांनी वाढून बंद झाले. दुसरीकडे, आशियाई बाजारात निक्केई 1.49 टक्के, हँगसेंग 1.27 टक्के, तैवान 1.09 टक्के, कोस्पी 0.54 टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

बजाज फायनान्सचा शेअर सेन्सेक्सवर सर्वाधिक तेजीत आहे. याशिवाय अॅक्सिस बँक, टाटा स्टील, नेस्ले इंडिया, आयटीसी, एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, विप्रो, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, पॉवरग्रीड, एशियन पेंट्स आणि टीसीएस तेजीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो आणि इंडसइंड बँकेचे शेअर्सही तेजीत आहेत.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि एचसीएल टेक सेन्सेक्सवर घसरणीसह व्यवहार करत होते.

'या' कंपन्यांचे तिमाही निकाल आज येणार:

इंडिगो, एसबीआय, आयटीसी, गेल (इंडिया) आणि युनायटेड स्पिरिट्ससह अनेक कंपन्या आज त्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT