Share Market Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची चांगली सुरुवात, सेन्सेक्स 62,900 पार, 'या' शेअर्समध्ये तेजी

देशांतर्गत बाजारात कालची वाढ आजही चालू राहू शकते असे संकेत आहेत.

राहुल शेळके

Share Market Opening 7 June 2023: भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस चांगला आहे, कारण देशांतर्गत बाजारात कालची वाढ आजही चालू राहू शकते.

कालच्या IT शेअर्सच्या घसरणीमुळे बाजारात थोडी घसरण होती, परंतु आज परिस्थिती थोडी सुधारत असल्याचे दिसते. बँक शेअर्समुळे बाजाराला आधार मिळत आहे.

आजच्या व्यवहारात, BSE चा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 124.51 अंकांच्या किंवा 0.20 टक्क्यांच्या वाढीसह 62,917 वर उघडण्यात यशस्वी झाला आहे.

याशिवाय, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 66.60 अंकांच्या किंवा 0.36 टक्क्यांच्या वाढीसह 18,665 वर उघडला.

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थीती:

आज, सेन्सेक्समधील 30 पैकी 21 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि केवळ 9 शेअर्स थोड्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय निफ्टीच्या 50 पैकी 39 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि केवळ 11 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

Share Market Opening 7 June 2023

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

नेस्ले इंडियाचा शेअर बीएसई सेन्सेक्सवर सर्वाधिक 1.24 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे पॉवरग्रीडमध्ये 0.76 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 0.68 टक्के, इन्फोसिसमध्ये 0.65 टक्के आणि एसबीआयमध्ये 0.54 टक्के तेजीने व्यवहार होत आहेत.

विप्रो, भारती एअरटेल, एनटीपीसी, एचडीएफसी, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, आयटीसी आणि सन फार्मा यांचे शेअर वधारले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्समध्ये एचसीएल टेक 0.35 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे बजाज फायनान्सचा शेअर 0.17 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता.

सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 40.5 अंकांच्या किंवा 0.22 टक्क्यांच्या वाढीसह 18,719.50 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

यावरून दलाल स्ट्रीटची सुरुवात सकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळाले. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 110 अंकांची वाढ दिसून आली. त्याचवेळी निफ्टीने 18,685 चा टप्पा ओलांडला होता.

स्टॉक एक्सचेंज बीएसईने अदानी समूहाच्या चार सूचीबद्ध कंपन्यांची डेली सर्किट मर्यादा वाढवली आहे. बीएसईने अदानी पॉवरची सर्किट मर्यादा पाच टक्क्यांवरून 20 टक्के केली आहे.

त्याचप्रमाणे अदानी ग्रीनचे सर्किट पाच टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी विल्मारची डेली सर्किट मर्यादा पाच टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT