Share Market opening  Sakal
Share Market

Share Market Opening: अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 72,000 पार, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Opening: अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक तेजीसह उघडले. सेन्सेक्स 72000 आणि निफ्टी 21800 च्या पुढे व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 30 January 2024: अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक तेजीसह उघडले. सेन्सेक्स 72000 आणि निफ्टी 21800 च्या पुढे व्यवहार करत आहे.

बाजारात सर्वाधिक खरेदी आयटी क्षेत्रात होत आहे. याशिवाय फार्मा आणि मेटल क्षेत्राकडूनही पाठिंबा मिळत आहे. निफ्टीमध्ये डॉ. रेड्डीज आणि टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात उर्जा ग्लोबलचे शेअर्स 10 टक्क्यांनी तर IREDA चे शेअर्स पाच टक्क्यांनी वाढले आहेत. पटेल इंजिनीअरिंग आणि ISMT सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही चांगली वाढ नोंदवण्यात आली.

शेअर बाजारात तेजी

शेअर बाजार तज्ज्ञांचा अंदाज

शेअर बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अलीकडच्या काळात निफ्टीने मोठी वाढ नोंदवली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 7 टक्के वाढ झाल्यामुळे सोमवारी निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की वॉल स्ट्रीट सर्वकालीन उच्चांक गाठत आहे.

अमेरिकेत, अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर सुधारला आहे, महागाईशी संबंधित चिंता कमी झाल्या आहेत आणि चांगल्या आर्थिक दृष्टीकोनामुळे, व्याजदरात कपातीची अपेक्षा आहे.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात ओएनजीसी आणि गेलचे शेअर्स वधारत होते तर कोल इंडिया आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स घसरत होते. निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक सारख्या निर्देशांकांत सुरुवातीच्या व्यवहारात तेजी होती.

S&P BSE SENSEX

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात हिंदाल्को, डॉ. रेड्डीज, विप्रो, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि एलटीआय माइंडट्रीचे शेअर्स वधारत होते, तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, आयटीसी, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड आणि लार्सन यांचे शेअर्स वधारत होते. अँड टुब्रोचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्समध्ये चांगली वाढ होत असून केवळ 14 शेअर्समध्ये घसरण होत आहे. सर्वाधिक वाढणाऱ्या 14 शेअर्समध्ये, विप्रो 1.34 टक्क्यांनी आणि टाटा मोटर्स 1.16 टक्क्यांनी वाढून अव्वल स्थानावर आहे.

भारती एअरटेल 1.11 टक्क्यांनी, इन्फोसिस 1.07 टक्क्यांनी आणि टेक महिंद्रा 1.04 टक्क्यांनी वर आहे. टीसीएसमध्ये 0.92 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि या आधारावर सेन्सेक्सच्या टॉप गेनर्समध्ये आयटी शेअर्सचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT