Share Market Opening Skala
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 500 अंकांच्या तेजीसह उघडला, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Opening: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. बाजाराला चांगल्या जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे. तसेच डिसेंबरच्या तिमाहीतील उत्कृष्ट निकालामुळे आयसीआयसीआय बँकेसह इतर शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 23 January 2024: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. बाजाराला चांगल्या जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे. तसेच डिसेंबरच्या तिमाहीतील उत्कृष्ट निकालामुळे आयसीआयसीआय बँकेसह इतर शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

त्यामुळे सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला. निफ्टीनेही सुरुवातीच्या व्यवहारात 21700 चा टप्पा पार केला. आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात खरेदी झाली. मीडिया क्षेत्रात जोरदार विक्री होत आहे.

सेन्सेक्समध्ये कोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 शेअर्समध्ये वाढ होत असून केवळ 4 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्सच्या सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्समध्ये, आयसीआयसीआय बँकेमध्ये 3.21 टक्क्यांची वाढ झाली. भारती एअरटेल 2.44 टक्क्यांच्या चांगल्या वाढीसह व्यवहार करत आहे. पॉवरग्रिड 2.32 टक्के आणि बजाज फिनसर्व्ह 1.80 टक्क्यांनी वर आहे.

सेन्सेक्समध्ये आज घसरलेल्या शेअर्समध्ये एशियन पेंट्स 1.79 टक्के आणि एचडीएफसी बँक 0.96 टक्क्यांनी खाली आहे. HUL 0.67 टक्क्यांच्या घसरणीसह आणि मारुती 0.32 टक्क्यांच्या घसरणीसह व्यापार करत आहे.

निफ्टीमध्ये कोणते शेअर्स वाढले?

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 38 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 12 शेअर्समध्ये घसरण होत आहे. आज निफ्टीचा टॉप गेनर सिप्ला आहे जो 6.48 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. ICICI बँक 3.70 टक्के आणि पॉवर ग्रिड 2.57 टक्क्यांनी वर आहे. Bharti Airtel 1.98 टक्क्यांच्या घसरणीसह आणि Hero MotoCorp 1.84 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

बँक निफ्टीची काय स्थिती?

बँक निफ्टी आज 367 अंकांच्या किंवा 0.80 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे आणि 46425 च्या पातळीवर पोहोचला आहे. बँक निफ्टीच्या 12 शेअर्सपैकी 9 शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आणि 3 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT