Share Market Latest Update Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजार पुन्हा नव्या उच्चांकावर; सेन्सेक्स-निफ्टी आणि बँक निफ्टी विक्रमी पातळीवर उघडले

Share Market Today: आज देशांतर्गत शेअर बाजारात विक्रमी सुरुवात झाली आहे. बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर उघडले आहेत. सेन्सेक्स-निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये रेकॉर्ड बनला आहे. आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 4 July 2024: आज देशांतर्गत शेअर बाजारात विक्रमी सुरुवात झाली आहे. बाजार नवीन विक्रमी उच्चांकावर उघडले आहेत. सेन्सेक्स-निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये रेकॉर्ड बनला आहे. आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. सेन्सेक्स 335 अंकांनी वाढून 80,321 वर उघडला आणि 80,331 वर पोहोचला.

निफ्टी 83 अंकांनी वाढून 24,369 वर उघडला आणि 24,372 वर गेला. बँक निफ्टी 268 अंकांच्या वाढीसह 53,357 च्या विक्रमी पातळीवर उघडला. आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, एचसीएल टेक, टीसीएस आणि टाटा मोटर्स हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर एचडीएफसी बँक, सिप्ला, श्रीराम फायनान्स, अदानी एंटरप्रायझेस आणि एचडीएफसी लाइफ यांचे शेअर्स घसरले.

Share Market Opening

बँकिंग आणि टेक शेअर्स तेजीत

आज, बँकिंग-फायनान्स आणि टेक शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात वाढ दर्शवत आहेत. सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँकेचा शेअर सर्वाधिक दीड टक्क्यांनी वाढला. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक हे शेअर्स तेजीत होते.

टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा या शेअर्सनीही चांगली सुरुवात केली. दुसरीकडे, एचडीएफसी बँकेचा शेअर सर्वाधिक घसरला. हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, आयटीसी या एफएमसीजी शेअर्सवर दबाव होता.

Share Market Opening

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.74 लाख कोटींची वाढ

3 जुलै 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,45,43,642.29 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 4 जुलै 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,47,18,028.84 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,74,386.55 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

BSE SENSEX

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी 27 शेअर्स तेजीत आहेत. आयसीआयसीआय बँक, एचसीएल आणि टीसीएसमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, आज फक्त एचडीएफसी बँक आणि आयटीसी घसरत आहेत.

आज BSE वर 2650 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 1993 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 541 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 116 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 171 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 6 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहेत. 132 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 39 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT