Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांचे 1.83 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Share Market Closing: देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण बुधवारीही वाढतच राहिली आणि सलग चौथ्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला. बँक निफ्टीवर बाजारात दबाव होता. बाजार दिवसाच्या निचांकी जवळ बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 29 May 2024: देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण बुधवारीही वाढतच राहिली आणि सलग चौथ्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला. बँक निफ्टीवर बाजारात दबाव होता. बाजार दिवसाच्या निचांकी पातळीच्या जवळ बंद झाला. निफ्टी 183 अंकांनी घसरला आणि 22,704 वर बंद झाला. सेन्सेक्स 667 अंकांनी घसरून 74,502 वर आणि निफ्टी बँक 640 अंकांनी घसरून 48,501 वर बंद झाला.

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यावेळी तुम्हाला अल्प मुदतीसाठी शेअर्सची खरेदी-विक्री टाळण्याची गरज आहे. जर तुम्ही दीर्घकालीन विचार करत असाल तरच तुम्ही शेअर बाजारात व्यवसाय करावा.

निवडणुकीच्या निकालामुळे शेअर बाजारात चढ-उतार होत आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, निवडणुकांमुळे शेअर बाजारात नफा मिळत नाही, जर बाजाराने 1200-1300 अंकांची वाढ पाहिली तर बाजारात घसरण होणे हे स्वाभाविक आहे.

Share Market Today

कोणते शेअर्स तेजीत?

बुधवारी, शेअर बाजाराच्या व्यवहारा दरम्यान, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. बुधवारच्या कमकुवत व्यवहारातही हिंदल्को, पॉवर ग्रिड, डिव्हिस लॅब्स, सिप्ला, बजाज ऑटो, सन फार्मा आणि भारती एअरटेलचे शेअर्स वाढले.

Share Market Today

तर एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, टाटा कंझ्युमर, टेक महिंद्रा, बीपीसीएल, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँकेचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. शेअर बाजारात बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी फार्मा इंडेक्स वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकांसह निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

S&P BSE SENSEX

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत गुंतवणूकदार सावध

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत, त्यामुळे शेअर बाजारात प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात देशांतर्गत निर्देशांकांत घसरण झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला लागणार आहेत आणि त्याबाबत बाजारात चांगलीच खळबळ उडाली आहे. FPIs भारतीय शेअर बाजारातून सतत पैसे काढत आहेत.

गुंतवणूकदारांचे 1.83 लाख कोटी रुपये बुडाले

BSE वर कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 29 मे रोजी 415.09 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवारी 28 मे रोजी 416.92 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 415.09 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 415.09 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT