share market sensex falls 440 points nifty tests 19650 Sakal
Share Market

Share Market : सेन्सेक्समध्ये ४४० अंशांची घसरण; नफावसुलीचा बाजाराला फटका

अमेरिकेत फेडरल बँकेने आज पाव टक्के व्याजदरवाढ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अमेरिकी फेडरल बँकेने केलेल्या व्याजदरवाढीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजारांमध्ये नफावसुली झाली. त्यामुळे सेन्सेक्स ४४०.३८ अंश, तर निफ्टी ११८.४० अंश घसरला. अमेरिकेत फेडरल बँकेने आज पाव टक्के व्याजदरवाढ केली. त्याचबरोबर अध्यक्षांनी केलेल्या विधानांमुळे बाजारात थोडी काळजी पसरली होती.

त्यामुळे सुरुवातीला बाजार वरच्या पातळीवर गेला होता तरीही नंतर नफावसुली झाल्यामुळे बाजारात घसरण झाली. सिप्ला, डॉक्टर रेड्डीज लॅब यांच्या चांगल्या निकालांमुळे; तसेच अरबिंदो फर्माला अमेरिकी फुड अँड ड्रग्जची संमती मिळाल्यामुळे आज औषधनिर्मिती कंपन्यांचे शेअर तेजीत होते. तर आलिशान घरांची मागणी वाढल्यामुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्राच्या शेअरकडेही सर्वांचे लक्ष होते. 

आज सेन्सेक्स ६६,९८४.१७ अंशापर्यंत वर गेला होता, मात्र त्याने ६७ हजारांना स्पर्श केला नाही. ६६,०६०.७४ पर्यंत खाली जाऊनही त्याने ६६ हजारांचा स्तर तोडला नाही. दिवसअखेर सेन्सेक्स ६६,२६६.८२ अंशांवर, तर निफ्टी १९,६५९.९० अंशांवर स्थिरावला.

‘बीएसई’वर आज सनफार्मा दोन टक्के, टाटा मोटर्स एक टक्का, तर एअरटेल, लार्सन अँड टूब्रो हे शेअर अर्धा टक्के वाढले. दुसरीकडे महिंद्रा आणि महिंद्राचा शेअर सव्वा सहा टक्के घसरला. टेक महिंद्रा चार टक्के घसरला, नेसले, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक दोन टक्के घसरले. आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक बँक, एचडीएफसी बँक एक टक्का घसरले.

युरोपीय मध्यवर्ती बँक आणि बँक ऑफ जपान यांच्या व्याजदरवाढीच्या बैठकीमुळे गुंतवणूकदार काळजी घेत आहेत. अमेरिकी फेडरल बँकेची भूमिका अजूनही स्पष्ट झाली नसल्याने भारतीय शेअर बाजार वरच्या स्तरावर आहे, त्याच पातळीत फिरण्याची शक्यता आहे.

-सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT